Paris Olympics 2024: चीनची बँडमिंटन खेळाडू ही बिंग जियाओ हिने खिलाडूवृत्ती दाखवत एक मोठं पाऊल उचललं. ऑलिम्पिकमध्ये बँडमिंडन महिला एकेरी स्पर्धेची 5 ऑगस्ट रोजी फायनल रंगली होती. या सामन्यात दक्षिण कोरियाच्या एन से-यंगने चीनच्या हि बिंग जियाओचा 21-13, 21-16 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. मात्र पदक प्रदान करणाऱ्या कार्यक्रमात रौप्य पदक जिंकणाऱ्या ही बिंग जियाओने तिच्या एका कृत्याने संपूर्ण जगाची सर्वांची मनं जिंकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पदक प्रदान करताना ही बिंग जियाओच्या हातात एक छोटी पीन पहायला मिळाली. ही पीन स्पेनच्या राष्ट्रध्वजाची होती. फायनलपूर्वी सेमीफायनलच्या सामन्यात ही बिंग जियाओचा सामना स्पेनच्या कॅरिलोना मारीनशी झाला होता. सामन्यात कॅरिलोना आघाडीवरही होती. मात्र दुखापतीमुळे तिला स्पर्धेबाहेर जावं लागलं. यामुळे ही बिंग जियाओ फायनलसाठी पात्र ठरली. फायनल सामन्यात पराभूत झाल्यानंतर ती पदक स्विकारताना कॅरिलोनाला विसरली नाही. ही बिंग जियाओने कॅरिलोनाचा आदर म्हणून पदक घेताना ही स्पेनचा राष्ट्रध्वज असणारी ही पीन हातात पकडली होती. तिच्या या कृत्याने तिचं जगभरात कौतुक होतंय. 


रविवारी पॅरिस ऑलिम्पिक बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत कॅरोलिना मारिन जखमी झाली यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. यावेळी स्पॅनिश खेळाडू आणि सेलिब्रिटींनी तिच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली. कॅरिलोना मारिनने रिओ 2016 मध्ये महिला एकेरीचं सुवर्णपदक जिंकले होतं आणि ती पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मार्गावर होती. परंतु चीनच्या हि बिंगजियाओ विरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या सेटमध्ये तिला गुडघ्याला दुखापत झाली, ज्यामुळे ती स्पर्धेबाहेर झाली. यावेळी कोर्टबाहेर पडताना तिने चाहत्यांना अभिवादन केलं. 


सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो


सेमीफायनलनंतर चीनच्या ही बिंग जियाओ हिला वॉकओव्हर मिळाला आणि ती महिला एकेरीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. बिंगजियाओला अंतिम फेरीत दक्षिण कोरियाचा स्टार ॲन से-यंगकडून पराभव पत्करावा लागला. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हे बिंग जियाओने कॅरोलिना मारिनला एका अनोख्या पद्धतीने आदर दिला. यावेळी सोशल मीडियावर तिचं कौतुक होताना दिसतंय.