अनसोल्ड सुरेश रैनाला CSK शेवटचा निरोप; चिन्ना थालासाठी खास व्हिडीओ
चैन्नई सुपर किंग्जने रैनाच्या आठवणींना एका खास पद्धतीने उजाळा दिलाय.
मुंबई : आयपीएल 2022 मेगा लिलावात अनेक आश्चर्यचकित गोष्टी पाहिल्या मिळाल्या. यापैकी एक म्हणजे मिस्टर आयपीएल म्हणून ओळख असलेल्या सुरेश रैनाला कोणीच विकत घेतलं नाही. आयपीएलच्या लिलावात तो अनसोल्ड राहिला. धोनीच्या सर्वात जवळच्या मानल्या जाणाऱ्या रैनावर चेन्नईनेही बोली लावली नाही. मात्र चैन्नईने रैनाच्या आठवणींना एका खास पद्धतीने उजाळा दिलाय.
चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या ट्विटर हँडलवरून 46 सेकंदांचा व्हिडीयो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये सुरेश रैना सीएसकेच्या जर्सीमध्ये हसत असल्याचं दिसतंय. त्याचसोबत आयपीएल जिंकल्यानंतर धोनीसोबत आनंद साजरा करतानाही तो दिसतोय. याला कॅप्शन देताना सीएसकेने म्हंटलंय की, 8 सेकंदात इनसाई आऊट...अंबुदेन नंद्री चिन्ना थला सुरेश रैना.
सुरेश रैनाची आयपीएलमधील कामगिरी ही चांगली राहिली आहे.य मागच्या सीजनमध्ये तो काही खास करु शकला नाही. 2 कोटी बेस प्राईज असलेल्या रैनावर यंदा कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे सुरेश रैना पुढे काय करणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे. अशी चर्चा आहे की, तो आयपीएलमधील संघ RCB सोबत जोडला जाऊ शकतो. पण तो कोणत्या भूमिकेत असेल हे अजून पुढे आलेलं नाही.
आरसीबी आणि सुरेश रैना यांच्या सध्या चर्चा सुरु असल्याचं देखील बोललं जात आहे. आयपीएलचं मेगा ऑक्शन संपलं आहे. पण तरी देखील आरसीबी त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे.
सुरेश रैना (Suresh Raina) ने अनेक सामन्यांमध्ये आपल्या शानदार खेळीने सीएसकेला विजय मिळवून दिले आहेत. तो एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. ज्याने सर्वच क्षेत्रात आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे.