BCCI Vice President Response to Aaditya Thackeray Statement : वर्ल्ड कपवर (T20 World Cup 2024) 17 वर्षांनंतर भारतीय संघाने नाव कोरल्यानंतर खेळाडूंचं दिल्ली आणि मुंबईत गुरुवारी (4 जुलै 2024 रोजी) भव्य स्वागत करण्यात आलं. मुंबईतील विजयी रॅलीमध्ये (mumbai victory parade) क्रिकेट प्रेमींची उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून अख्खा जग भारवलं. पण हा मुंबईकरांचा विजयोत्सव बाजूला राहिला आणि वर्ल्ड कपवरुन राजकारण सुरु झालाय. मुंबईतील विजयी रॅलीवरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला. त्यावर आता BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी उत्तर दिलंय. 


काय म्हणाले आदित्य ठाकरे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया X वर एक पोस्ट शेअर केलं. ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, हा उत्सव बीसीसीआयला एक मजबूत संदेश आहे. की मुंबईकडून विश्वचषक फायनल कधीही हिरावून घेऊ नका. 



राजीव शुक्ला म्हणाले की...


आदित्य ठाकरेंच्या मागणीवर राजीव शुक्ला यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले की, '1987 च्या वर्ल्ड कपची फायनलही कोलकात्यातच झाली होती आणि कोलकाताला भारतात क्रिकेटचा मक्का म्हटलं जातं. त्यामुळे फायनल ठराविक शहरातच व्हावी, असं ठरवता येणार नाही. अनेक सेमीफायनल आणि फायनल मुंबईत झाल्या आहेत. तसंच, अहमदाबादच्या मैदानाची 1,30,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे, त्यामुळे आम्हाला क्षमता देखील पहावी लागते. कोलकातामधील ईडन गार्डन्सची क्षमता खूप मोठी आहे, सुमारे 80,000 प्रेक्षक तिथे येऊ शकतात. इतर शहरांमध्येही हीच स्थिती आहे.'


मुंबई ही आमची नेहमीच....


ते पुढे म्हणाले की, 'हा निर्णय संपूर्ण देश आणि सर्व स्टेडियम्सना लक्षात घेऊन घेण्यात येतो. तुम्ही फक्त एका ठिकाणापुरते मर्यादित राहू शकत नाही. मुंबईतील लोक आपल्या खेळाडूंच्या स्वागतासाठी जमलेलं पाहून आम्हाला खूप आनंद झाला. मुंबईला आमचं नेहमीच प्राधान्य असतं, पण फायनल कुठे घ्यायची, सेमीफायनल कुठे करायची हे संपूर्ण बीसीसीआय ठरवतं. प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. मुंबई आमच्या प्राधान्याच्या यादीत नेहमीच असतं, पण सर्व फायनल एकाच शहरात व्हायला हव्यात असं म्हणणे. हे कोणत्याही देशात घडत नाही.'