जेव्हा टी-२० सामना खेळताना शिखर धवनला ICCचे नियम माहित नसतात..
आपल्या तडाखेबंद फलंदाजीने धावांचे शिखर रचणाऱ्या शिखर धवनबाबात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिखरला टी-२०चा पहिला सामना खेळताना ICCचे नियमच माहित नव्हते. आता बोला. वाचून बसला ना धक्का? पण, ही बाब स्वत: शिखर धवननेही मान्य केली आहे.
मुंबई : आपल्या तडाखेबंद फलंदाजीने धावांचे शिखर रचणाऱ्या शिखर धवनबाबात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिखरला टी-२०चा पहिला सामना खेळताना ICCचे नियमच माहित नव्हते. आता बोला. वाचून बसला ना धक्का? पण, ही बाब स्वत: शिखर धवननेही मान्य केली आहे.
आयसीसीने अलकडेच क्रिकेट नियमांमध्ये काहिसे बदल केले. नुकत्याच झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांमध्ये हे नियम लागू नव्हते. पण, त्यानंतर सुरू झालेल्या टी-२०पासून हे नियम लागू करण्यात आले. आयसीसीने कोणत्याही नियमांमध्ये बदल केले की, त्याची माहिती खेळाडूंना दिली जाते. खेळाडूंनीही नव्या नियमांबाबत जाणून घेणे अपेक्षित असते. पण, गंमत अशी की, भारताचा तडाखेबंद फलंदाज शिखर धवनच्या बाबतीत काहीसे भलतेच घडले. शिखर धवनला नियम बदलल्यावर झालेल्या टी-२०च्या पहिल्या सामन्यात त्याची कल्पनाच नव्हती. एका पत्रकार परिषदेत स्वत: शिखर धवननेही ही बाब स्विकारली आहे.
काय आहे बदललेला नियम
आयसीसीने बदललेला नियम असा की, जर एखादा सामना १० षटकांपेक्षा (ओव्हर्स) कमी केला असेल तर, गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी ठरवून दिलेला षटकांचा (ओव्हर्स) कोटा हा २ षटकांपेक्षा कमी असणार नाही. म्हणजेच सामना जर ५ षटकांचा झाला तर, कमीत कमी दोन गोलंदाज २-२ षटके टाकू शकतात.
दरम्यान, पहिल्या टी-२० सामन्यात भारताला डवर्थ लुईस नियमांतर्गत विजयासाठी ६ षटकांमध्ये ४८ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. यात केवळ नाथन कुल्टर नाईल यानेच आपल्या कोट्यातील २ षटके टाकली. तर, जेसन बेहरेनड्रॉफ, डॅनियल क्रिश्चियन, एडम जॅम्पा आणि एण्ड्र्यू टाई याने प्रत्येक १-१ षटक टाकले. ऑस्ट्रेलियाचा खेळाडून एरॉन फिंच स्वत:ही या नव्या नियमाबाबत गोंधळलेला दिसत होता. सामन्यानंत फिंच याने सांगितले की, ऑस्ट्रेलियाच्या ५व्या षटकापर्यंत मला या बदललेल्या नियमाची कल्पना नव्हती. पण, ब्रेक वेली जेव्हा स्टीव्ह स्मिथ ड्रिंक घेऊन मैदानात आला तेव्हा मला बदललेल्या नियमांबाबात समजले. त्यानंतर बदललेल्या नियमाबाबत फिंच याने थेट पंचांनाच विचारले. मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात नव्याने करण्यात आलेल्या बदलाबाबत फिंचने आश्चर्यही व्यक्त केले.