मुंबई : बंगळूर टीमच्या एबी डिविलियर्सने शनिवारी आपल्या सदाबहार अंदाजात बॅटींग करत दिल्लीच्या टीमला २ ओवर आणि ६ विकेट शिल्लक ठेवून हरविले. त्याने ३९ बॉलमध्ये ९० रन्सची खेळी करत मैदानात रन्सचा पाऊस पाडला. यामध्ये १० फोर आणि ५ सिक्सर होते. दरम्यान 'आयपीएल ११' चा सर्वात मोठा सिक्सरही लगावला. हा टोलावलेला चेंडू सरळ जाऊन चिन्नास्वामी स्टेडियमच्या छतावर गेला. राहुल तेवतियाची दहावी ओव्हर सुरू होती. ओव्हरचा तिसरा बॉल डिविलियर्सने डीप मिडविकेटकडे पुल शॉट खेळला आणि बॉल स्टेडियमच्या छतावर आदळून स्टेडियममध्ये आला. त्यामूळे लगेच मॅच सुरू झाली.


१०६ मीटरचा सिक्स 


आफ्रिकेच्या या धुवाधार फलंदाजाने आयपीएल मधला आतापर्यंतचा सर्वात मोठा सिक्सर लगावला. हा सिक्स १०६ मीटर एवढा होता. याआधी कोलकाता टीमच्या आंद्रे रसेलने १०५ मीटर लांब सिक्सर लगावला होता.