`तो` Playing XI मध्ये नसेल तर भारत World Cup जिंकणार नाही; AB de Villiers स्पष्टच बोलला
Ab De Villiers On World Cup 2023 Team India: भारताने 5 सप्टेंबर रोजी विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. या संघामध्ये एकूण 15 खेळाडूंचा समावेश असून याच खेळाडूंपैकी एकाबद्दल ए. बी. डिव्हिलियर्सने आपलं मत व्यक्त केलं आहे.
Ab De Villiers On World Cup 2023 Team India: एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक 2023 ची स्पर्धा सुरु होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा यंदा भारतात आयोजित केली जाणार असून 5 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा पूर्णपणे भारतातच खेळवली जाणार आहे. 2011 मध्ये भारताने विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा भारतात खेळवण्यात आली होती. मात्र यातील काही सामने श्रीलंका आणि बांगलादेशमध्येही झाले होते. यंदा सर्व सामने भारतीय मैदानांवरच होणार आहेत. 5 सप्टेंबर रोजीच विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 सदस्यांच्या या संघामध्ये आशिया चषकासाठी पाठवण्यात आलेल्या संघालाच प्राधान्य देण्यात आलं आहे. या संघामधील काही नावं नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं तर काही नावं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. मात्र यापैकी एक नाव असं आहे जे पाहून दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज ए. बी. डिव्हिलियर्सला फारच आनंद झाला आहे. हा खेळाडू कोण आहे पाहूयात...
...म्हणून त्याला संघात स्थान
भारतीय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी 5 सप्टेंबर रोजी श्रीलंकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विश्वचषकासाठीच्या भारतीय संघाची घोषणा केली. या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं असून हार्दिक पंड्या संघाचा उपकर्णधार असणार आहे. आश्चर्याचा बाब म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये फारशी चमक न दाखवू शकलेल्या सूर्यकुमार यादवलाही भारताच्या विश्वचषकासाठीच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याची सरासरी 25 इतकी कमी असतानाही त्याला संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या हिशोबाने ही सरासरी फारच सुमार आहे. मात्र सूर्याची कामगिरी आणि आकडेवारी पाहून त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. तर त्याची क्षमता पाहून त्याला संघात स्थान दिलं गेलं आहे. सूर्यकुमार यादवला सध्या लय गवसत नसली तरी त्याची क्षमता क्रिकेट जगताला चांगलीच ठाऊक आहे.
नक्की वाचा >> आगरकर मोठा धक्का देण्याच्या तयारीत? World Cup संघातून 'या' दोघांना मिळू शकतो डच्चू तर...
तो संघात असेल तर विजयाची शक्यता अधिक
सूर्यकुमारला संधी दिल्याचं पाहून ए. बी. डिव्हिलियर्सला फार आनंद झाला आहे. त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवरुन यासंदर्भात भाष्य केलं आहे. "स्कायला विश्वचषकाच्या संघात पाहून मला आनंद झाला आहे. तुम्हाला ठाऊक आहे की मी त्याचा मोठा पाठीराखा आहे. तो खरं तर मी ज्या पद्धतीने टी-20 क्रिकेट खेळायचो तसाच खेळतो. त्याला आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये फारसं यश मिळालेलं नाही. मात्र हा फार छोटा खेळ आहे. माइंड स्विच करणं ज्याला जमतं तो यशस्वी ठरतो. हे असं माइंड स्विच करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. मला अपेक्षा आहे की त्याला एकदिवसीय विश्वचषकाच्या स्पर्धेत अंतिम 11 जणांमध्ये संधी मिळेल. असं झालं तर भारत विश्वचषक जिंकण्याची शक्यता नक्कीच अधिक असेल," असं ए. बी. डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> सचिनने शुभमनसाठी केलेल्या Birthday Post मधील शेवटच्या 'त्या' 2 शब्दांचा अर्थ काय? अनेकांना आली भलतीच शंका
आशिया चषकात तो संघाबाहेरच
एकीकडे ए. बी. डिव्हिलियर्स सूर्यकुमारची पाठराखण करत असताना दुसरीकडे विश्वचषकाची रंगीत तालिम मानल्या जात असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये संघात असूनही सूर्यकुमार यादवला अंतिम 11 खेळाडूंमध्ये आतापर्यंत संधी मिळालेली नाही. नेपाळ, पाकिस्तानविरुद्ध सूर्याला खेळवण्यात आलं नाही. आता पाकिस्तानविरुद्धच्या 'सुपर-4'मध्ये तरी त्याला खेळवणार का हे पहावं लागणार आहे.
नक्की वाचा >> 200+ Strike Rate... रिंकू आला, धुलाई करुन सामाना जिंकवून गेला! T20 स्पेशलिस्ट नावाला जागला
45 चेंडूंमध्ये 92 धावांची खेळी आठवली
संजू सॅमसनबद्दलही ए. बी. डिव्हिलियर्सने कौतुकाचे बोल काढले आहेत. संजू सॅमसन हा प्रतिभावान खेळाडू आहे असं ए. बी. डिव्हिलियर्स म्हणाला आहे. 2018 मधील कामगिरीचा उल्लेख ए. बी. डिव्हिलियर्सने केला आहे. या खेळीमध्ये संजूने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 45 चेंडूंमध्ये 92 धावांची खेळी करत रॉयल चँलेंजर्स बंगळुरुला पराभूत करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यावेळी ए. बी. डिव्हिलियर्स हा आरसीबीच्या संघाकडून खेळत होता. "मी त्याच्या शतकादरम्यान (92 नाबाद) चेन्नस्वामी स्टेडियममध्ये चेंडू इकडे तिकडे जात असताना टार्गेटवर होतो. त्याच्याकडे अनेक शॉट्सचं कलेक्शन आहे. हे सर्व काही एकदिवसीय क्रिकेट समजून घेणं आणि ताळमेळ साधण्यासंदर्भात आहे," असं ए. बी. डिव्हिलियर्सने सांगितलं.
विश्वचषकासाठी भारतीय संघ असा आहे -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार ), के. एल. राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव