लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे पाकिस्ताननं यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला विजय मिळवला.


या मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्सला पाकिस्तानच्या इमाद वासीमनं शून्यवर बाद झाला. वनडे क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलला शून्यवर एबी पहिल्यांदाच आऊट झाला आहे. तर टेस्ट आणि टी-20 मध्ये एबी एकूण सहावेळा पहिल्या बॉलवर आऊट झाला आहे. एबी डिव्हिलियर्सनं आत्तापर्यंत २२१ वनडे मॅचमध्ये २१२ इनिंग खेळल्या आहेत.