HeartBreaking! Mr. 360° एबीडीचा क्रिकेटला अलविदा
एबी डिविलीयर्सने सर्व प्रकारातल्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये.
मुंबई : साऊथ आफ्रिकेचा स्टार फलंदाज आणि MR 360 अशी ओळख असणाऱ्या एबी डिविलीयर्सने निवृत्ती घेतली आहे. इन्स्टाग्रावर पोस्ट टाकून डिविलीयर्सने निवृत्ती जाहीर केली आहे. एबी डिविलीयर्सने सर्व प्रकारातल्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. आयपीएलमधून तो रॉयल चॅलेंजर बंगळूरूकडून खेळत होता.
एबी डिविलीयर्स त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, "क्रिकेटमधील हा एक अविश्वसनीय प्रवास होता, पण मी सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकी वर्ष मी हा खेळ निखळ आनंदाने आणि उत्साहाने खेळलो आहे. आता, वयाच्या ३७ व्या वर्षी मी तेवढ्या क्षमतेने खेळू शकत नाही"
एबी पुढे लिहितो, मला याची जाणीव आहे की, माझे कुटुंबिय आईवडील, भावंड, माझी पत्नी आणि मुलं यांनी केलेल्या तडजोडीशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. मी आमच्या आयुष्याच्या पुढील टप्प्याची वाट पाहतोय ज्याठिकाणी मी त्यांना अग्रस्थानी ठेवेन."
"मी प्रत्येक टीमचे सहकारी, प्रत्येक प्रतिस्पर्धी, प्रत्येक प्रशिक्षक, प्रत्येक फिजिओ आणि प्रत्येक कर्मचारी सदस्याचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी माझ्यासोबत त्याच मार्गावर प्रवास केला आणि दक्षिण आफ्रिकेत, भारतात, मी जिथे जिथे खेळलो तिथे मला मिळालेल्या समर्थनामुळे मी आभारी आहे, असंही तो म्हणालाय.
टायटन्स, किंवा प्रोटीज, किंवा आरसीबी यांनी मला अकल्पित अनुभव आणि संधी दिल्या आहेत आणि मी नेहमीच कृतज्ञ राहीन, असं म्हणत त्यांने सर्वांचं आभार मानलंय.