मुंबई : एबी डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घ्यायचा निर्णय घेतला आहे. एबीने एका व्हिडिओत म्हटलं आहे की, आता नव्या पिढीला खेळण्याची संधी मिळणार आहे. डिविलियर्सने अॅपद्वारे निवृत्तीची घोषणा केली. मात्र तो स्थानिक क्रिकेट खेळणार असल्याचं सांगितलं आहे. डिविलियर्सने दक्षिण आफ्रिकेसाठी 114 टेस्ट, 228 वन डे आणि 78 टी 20 इंटरनॅशनल मॅच खेळले आहेत. 



काय म्हणाला एबी डिविलियर्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


माझा टर्न संपला आणि खरे सांगायचे तर मी थकलो. हा निर्णय कठीण होता. खूप वेळ मी याबाबत विचार केला त्यानंतर हा निर्णय घेतला. चांगले क्रिकेट खेळत असताना निवृत्ती घेणे योग्य आहे, असे डेविलियर्स म्हणाला. मला आतापर्यंतच्या दिलेल्या सहकाराबद्दल इतर खेळाडू आणि स्टाफचे आभार मानतो. इथेच थांबवण्याची ही योग्य वेळ आहे. मी सर्वांचे आभार मानतो. दक्षिण आफ्रिका आणि जगभरातील माझ्या क्रिकेट चाहत्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल आभार. पुढे खेळण्याबाबतचे माझे कोणतेही प्लान्स नाही आहेत.