मुंबई - भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्यामध्ये वन डे सिरीज खेळली जात आहे, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिरीजच्या सुरूवातीच्या 3 मॅचपासून दक्षिण आफ्रिकेचा सर्वात धाकड फलंदाज ए बी डी विलियर्स बाहेर आहे. विलियर्स पहिल्या मॅचपासूनच प्लेइंग इलेवनचा हिस्सा नाही. आणि याच कारणामुळे गेल्या 12 वर्षात जे घडलं नाही ते सर्वात प्रथम क्रिकेटच्या इतिहासात घडलं आहे. असं पहिल्यांदा झालं की जेव्हा डी विलयर्स भारताच्या विरूद्ध वन डे मॅचमध्ये आपल्यी टीमकडून खेळला नाही. विलियर्स 2005 पासून भारताच्या विरूद्ध सगळे सामने खेळला आहे. 


आता 12 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, विलियर्स भारत - दक्षिण आफ्रिका वन डे मॅचमध्ये आपल्या टीमचा हिस्सा झाला नाही. 2005 पासून आतापर्यंत भारत - दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 27 सामने झाले. आणि यात सगळ्या 27 वन डे मॅचमध्ये विलियर्स खेळलेला आहे. 


या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या टीमने पहिल्यांदा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या ओपन फलंदाजाने टीमला चांगली सुरूवात करून दिली. आणि एकही विकेट न जाण्याची पूर्ण काळजी घेतली.