Abrar Ahmad, Pak vs Eng: साल होतं 2004... टीम इंडिया पाकिस्तानच्या दौऱ्यावर (IND vs PAK) होती. टेस्ट सिरीजमधील पहिला सामना मुलतानमध्ये खेळला गेला. या सामन्यात 'विरेंद्र सेहवाग' नावाचं वादळ (Virender Sehwag Multan Ka Sultan) आलं. तब्बल 39 फोर आणि 6 सिक्स खेचत सेहवागने पाकिस्तानमध्ये एकच दहशत पसरवली. सेहवागने या सामन्यात तब्बल 309 धावा खेचल्या. पाकिस्तानी बॉलरला बॉल कुठं टाकावा कळेना. सेहवागची बॉटिंग पाहून पाकिस्तानमध्ये एकप्रकारे कर्फ्यू लागला होता. अनेक पाकिस्तानी फॅन्स त्यादिवशी रडले. त्यात एकजण होता, आजच्या सामन्याचा हिरो 'अबरार अहमद'... (Pakistan vs England hero Abrar Ahmed cry when virender sehwag washed by triple century)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड आणि पाकिस्तान (PAK vs ENG) यांच्यामध्ये मुलतानमध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवला जातोय. या सामन्यात डेब्यू करणाऱ्या अबरार अहमदची (Abrar Ahmad) जादू पहायला मिळाली. 7 विकेट घेत अबरारने इंग्लंडच्या फलंदाजांच्या तोडंचं पाणी पळवलं. मात्र, एक काळ होता, जेव्हा हाच अबरार अहमद सेहवागमुळे ढसाढसा (Virender Sehwag) रडला होता.


अबरार अहमदच्या भावाने एका मुलाखतीत अबरारचा किस्सा सांगितला होता. ज्यावेळी विरेंद्र सेहवागने पाकिस्तानच्या मुलतानमध्ये (Ind vs Pak 2004 Multan Test Match) हैदोस घातला. पाकिस्तानच्या बॉलर्सला सेहवागने (Virendra Sehwag Triple Century) रडकुंडीला आणलं. त्याचवेळी अबरार सहा वर्षांचा होता. अबरारला क्रिकेटचं खूप येड... त्यात भारत आणि पाकिस्तान सामना त्याच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय. सेहवाग फोडत असताना अबरार खूप रडला. त्यावेळी तो सकलैन मुश्ताकला (Saqlain Mushtaq) दोष देत होता.


आणखी वाचा - PAK vs ENG : अब की बार 'अबरार'! पाकिस्तानला भेटला नवा मिस्टी स्पीनर Abrar Ahmed


दरम्यान, अबरारला (Abrar Ahmad) मोठा धक्का बसला होता. त्यावेळी तो नेहमी सकलैन मुश्ताकच्या चुकांबद्दल बोलायचा. त्यामुळे त्याच्या घरचे वैतागले होते. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला दुसऱ्या खोलीत देखील कोंडून ठेवलं होतं. मात्र, त्यानंतर त्याचं क्रिकेटप्रेम वाढत गेलं आणि त्याने पाकिस्तानसाठी खेळण्याचा (Pakistan Cricket) निर्णय घेतला. खूप चढउतार पाहिल्यानंतर अखेर त्याने आज पाकिस्तान संघात डेब्यू (Abrar Ahmad debut Match) केला आहे.