Mayank Agarwal: गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला मयंक अग्रवाल मंगळवारी अचानक आजारी पडल्याचं समोर आलं. त्याची तब्येत इतकी खालावली की त्याला रूग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ माजली. दरम्यान या मोठ्या घटनेनंतर मयंकने काही षडयंत्र असल्याचा आरोप करत पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केलीये. इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये त्याच्या सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून तो पाणी समजून एक पेय प्यायला. ते प्यायल्यानंतर त्याची तब्येत खालावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयंकने त्याच्या व्यवस्थापकामार्फत पोलिसांत रितसर तक्रार दाखल केलीये. पश्चिम त्रिपुराचे पोलीस अधीक्षक किरण कुमार यांना दिलेल्या माहितीनुसार, “मयांक अग्रवाल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांच्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी NCCPS (न्यू कॅपिटल कॉम्प्लेक्स पोलिस स्टेशन) मध्ये तक्रार दाखल केली आहे. 


मयंकच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, मयंक जेव्हा विमानात चढत होता तेव्हा त्याच्यासमोर एक पाऊच ठेवण्यात आलं होतं. यावेळी मयंकने त्यातील पेय थोडेसं प्यायलं पण अचानक त्याच्या तोंडात जळजळ सुरू झाली आणि तो बोलू शकला नाही. तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्याच्या तोंडाला सूज आणि व्रण होते. 


मयंकचे ओठ आणि चेहरा सूजला


राज्याचे आरोग्य सचिव किरण गित्ते म्हणाले, "पोलिसांनी याबाबत तक्रार नोंदवली असून आम्ही या प्रकरणाची चौकशी करू." त्याच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, तो बंगळुरूला जाणार आहे. आयएलएस रुग्णालयाच्या वतीने व्यवस्थापक मनोज कुमार देबनाथ हेल्थ अपडेट देत म्हटलं होतं की, त्याला जळजळ झाली होती आणि त्याचे ओठ सुजले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी आपत्कालीन विभागात तपासणी केल्यानंतर, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.


पुढचे दोन सामने खेळणार नाही मयंक


मयंक रणजी ट्रॉफीमधील पुढील रेल्वेविरुद्ध पुढचा रणजी सामना खेळणार नाही. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “तो कर्नाटकच्या पुढील सामन्यात खेळणार नाही. या व्यतिरीक्त उडणाऱ्या अफवांमध्ये काहीही तथ्य नाहीये. आता त्याची तब्येत स्थिर आणि आम्ही राज्यातील डॉक्टर आणि इतर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.