मुंबई : आयपीएलच्या  14 व्या मोसमातील (IPL 2021) उर्वरित सामन्यांची तारीख ठरली आहे. 4 मे रोजी कोरोनाच्या (Corona) वाढत्या संसर्गामुळे बीसीसीआयने (BCCI) स्पर्धा स्थगित केली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या एका विशेष सभेत उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता यूएईमध्ये (UAE) उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यूएईमध्ये आयपीएलचं आयोजन करण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या उर्वरित सामन्यांना 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर अंतिम सामना हा 15 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. मात्र याबाबत बीसीसीआयने अद्याप औपचारिक घोषणा केलेली नाही. (according to media reports ipl 2021 statrt to 19 september and final match play will 15 october)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एएनआयसोबत संवाद साधताना ही माहिती दिली. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "बीसीसीआय या उर्वरित सामन्यांसाठी 25 दिवसांच्या विंडोच्या शोधात होती. यूएई क्रिकेट बोर्डासोबत झालेली बैठक सकारात्मक झाली.  यूएई बोर्डाने या बैठकीआधी 14 वा मोसम यूएईमध्ये खेळण्याची तोंडी परवानगी दिली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत औपचारिक घोषणा करण्यात आली. या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होईल", असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. दरम्यान हे उर्वरित सामने यूएईमधील अबूधाबी, शारजाह आणि दुबईत खेळवण्यात येणार आहे.    


परदेशी खेळाडूंबाबत बीसीसीआय प्रयत्नशील


आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन  सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये केलं आहे. मात्र, या दरम्यान अनेक परदेशी खेळाडू हे आपल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यात बिजी असणार आहेत. त्यामुळे या खेळाडूंना आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी उपस्थित राहता येणार नाही.  परदेशी खेळाडू हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असतात. यामध्ये विशेष म्हणजे वेस्टइंडिजचे खेळाडू हे आकर्षणाचा केंद्रबिदू असतात. 


वेस्टइंडिजमध्ये सीपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विंडिजच्या  खेळाडू्ंना सुरुवातीच्या काही सामन्यांना तसेच सर्वच सामन्यांना उपस्थित राहता येणार नाही. यामुळे सीपीएलने या सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा, या संदर्भात बीसीसीआय वेस्टइंडिज आणि इतर बोर्डांना विनंती करणार आहे. 


यावर अधिकाऱ्याने म्हटलं की, " विविध क्रिकेट बोर्डांकडून बीसीसीआयला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे बहुतेक खेळाडू हे उर्वरित सामन्यात खेळतील.  जर काही खेळाडू खेळले नाहीत, तर त्यांच्या बाबतीत नंतर निर्णय घेतला जाईल. उर्वरित सामन्यांचे आयोजन हे कोणत्याही विघ्नाशिवाय होईल ".  


दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये अव्वल स्थानी  


ताज्या आकडेवारीनुसार, 29 सामन्यानंतर पॉइंट्सटेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स अव्वल क्रमांकावर आहे. पंतने आपल्या नेतृत्वात दिल्लीला 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवून दिला. दिल्ली 12 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. 


संबंधित बातम्या :


T 20 World Cup 2021साठी काय आहे BCCIचा बॅकअप प्लॅन?