T 20 World Cup 2021साठी काय आहे BCCIचा बॅकअप प्लॅन?

टी 20 वर्ल्ड कप आता IPL प्रमाणेच भारताबाहेर होणार? काय असेल BCCIचा प्लॅन 

Updated: Jun 6, 2021, 01:49 PM IST
T 20 World Cup 2021साठी काय आहे BCCIचा बॅकअप प्लॅन?

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपच्या सामन्यांचा पेच अद्यापही सुटलेला नाही. 4 मे रोजी बायो बबलमध्ये खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले. स्थगित केलेले 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान घेतले जाणार असल्याचं BCCIने स्पष्ट केलं. त्या कालावधीमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू या सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत अशीही चर्चा सुरू आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये टी 20 वर्ल्डचे सामने नेमके कुठे होणार याचा पेच काही अद्याप सुटलेला नाही. 

बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार सध्यातरी भारतातच टी 20 वर्ल्डकपचं आयोजन करण्यात येणार आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये जर टी 20 वर्ल्डकपचे सामने भारतात घेणं शक्य झालं नाही तर बॅकअप प्लॅन नेमका काय आणि कसा असेल जाणून घेऊया.

भारतात आतातरी कोरोनाचे आकडेवारी दिलासादायक असली तरी सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ही परिस्थिती काय असू शकते हे आता सांगणं तसं कठीण आहे. मात्र बीसीसीआयचा त्यासाठीच बॅकअप प्लॅन तयार आहे. IPL प्रमाणेच टी 20 वर्ल्ड कपचे सामने UAEमध्ये खेळवले जाण्याची शक्यता आहे. 

टी 20 वर्ल्ड कपसाठी आयसीसीने ओमान क्रिकेट बोर्डला संपर्क केल्याची माहिती मिळाली आहे. सध्या यासंदर्भात बैठक सुरू आहे. बीसीसीआयला 28 ऑगस्टपर्यंत IPL आणि टी 20 वर्ल्ड कपचे शेड्युल निश्चित करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये नेमकी काय हे स्पष्ट होऊ शकेल. मात्र BCCI आणि ओमान बोर्डची देखील चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कप खरंच UAEमध्ये शिफ्ट होणार का ते येत्या काही दिवसांत अधिक स्पष्ट होईल.