मुंबई : भारतीय संघाला एक युवा खेळाडू मिळाला आहे. जो आपल्या वेगवान गोलंदाजीने विरुद्ध संघाला अडचणीत आणू शकतो. T20 वर्ल्डकप 2022 (T20 World Cup) मध्ये टीम इंडियाला अपयश आलं. त्यानंतर आता टीम न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पण टी20 वर्ल्डकपमध्ये युवा गोलंदाज उमरान मलिकची निवड झाली. पण तो फक्त नेट बॉलर म्हणून खेळला. त्यामुळे त्याला त्याची कामगिरी सिद्ध करता आली नाही. यावर आता त्याच्याच वडिलांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य ऐकून तुम्ही ही हैराण व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमरान मलिकचे (Umran Malik) वडील अब्दुल रशीद म्हणाले की, 'टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याला खेळवले नाही हे चांगले झाले. लोक म्हणत होते ना, की वर्ल्ड कप नाही खेळला. पण चांगलं झालं की त्याला खेळवलं नाही. जी गोष्ट जेव्हा व्हायची असते तेव्हा ती होते. तुम्हाला कशाच्या मागे धावण्याची गरज नाही. उमरान अनुभवी खेळाडूंसह आहे. तो शिकेल, घाई करण्याची गरज नाही.'


उमरान मलिकने आयपीएल 2022 मध्ये आपल्या गोलंदाजीने सगळ्यानाच प्रभावित केले होते. आयपीएलनंतर त्याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली. टी20 वर्ल्डकपमध्ये ही संघात त्याला संधी मिळाली. पण त्याला खेळवलं नाही. उमरान मलिकने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आता पदार्पण केले आणि 149.6 च्या वेगाने बॉल टाकला. त्याने 10 ओव्हरमध्ये 66 धावा देत 2 विकेट घेतल्या.