मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये सापडला स्टार खेळाडू, ऑलंम्पिकला जाण्याचं स्वप्न भंगलं
Achinta Sheuli Controversy: उभरत्या खेळाडूने 2022 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. त्याने सर्वोत्तम खेळ करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले होते.
Achinta Sheuli Controversy: भारतीय वेटलिफ्टर अंचिता शेऊली वादात सापडलाय. मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसताना त्याला पकडण्यात आलंय. एका सिक्योरिटी गार्डने बनवलेल्या व्हिडीओमुळे हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर अंचिताचे आगामी ऑलम्पिक खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. 22 वर्षाच्या या उभरत्या खेळाडूने 2022 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. त्याने सर्वोत्तम खेळ करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले होते.
गुरुवारी मध्यरात्री अंचिता गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी एनआयएस पटियालाच्या हॉस्टेलमधील सिक्योरिटी गार्डने हे पाहिले. त्याने अंचिताला पकडले आणि त्याचा व्हिडीओदेखील बनवला. यासंदर्भात भारतीय खेळ प्राधिकरण म्हणजेच एसएआय आणि एनआयएस पटियालाच्या कार्यकारी संचालक विनीत कुमार यांना यासंदर्भात तात्काळ कळवण्यात आलं. या घटनेत व्हिडीओ हा सबळ पुरावा असल्याने कोणतीही शोध समिती बसली नाही.
असे बेशिस्त वर्तन सहन केले जाणार नाही. या प्रकारानंतर अंचिताला तात्काळ कॅम्पमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय,असे भारतीय भारोत्तोलन महासंघ म्हणजेच आयडब्ल्यूएलएफच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले.
ऑलम्पिकला जाण्याचं स्वप्न भंगलं
ट्रेनिंग कॅम्पमधून काढून टाकण्यात आल्यानंतर अंचिताचे ऑलंम्पिकला जाण्याचे स्वप्न भंगले. यामुळे तो थायलंडच्या फुकेतमध्ये होणाऱ्या आयडब्लूएफ वर्ल्ड कपमध्ये खेळू शकत नाही. येथे खेळणे त्याच्यासाठी महत्वाचे होते कारण पॅरिल ऑलम्पिक क्वालिफिकेशनसाठी हा खेळ अनिवार्य होता.
दुखापतीतून तो बाहेर आल्यानंतर त्याने चांगल्याप्रकारे ट्रॅकवर येण्यास सुरुवात केली होती. अंचित सध्या ऑलम्पिक क्वालिफिकेशन रॅंकींगमध्ये 27 व्या रॅंकवर आहे. त्याच्याकडे ऑलम्पिक कोटा मिळवण्याची संधी होती.
शिस्तभंगामुळे कॅम्पमधून बाहेरचा रस्ता
पटियालामध्ये पुरुष आणि महिला खेळाडुंसाठी वेगवेगळे हॉस्टेल आहे. सध्या महिला बॉक्सर, आणि कुस्तीपटू खेळाडू एनआयएसमध्ये राहत आहेत. पुरुष खेळाडुंनी येथे जाण्यास सक्त मनाई असते. तसे निर्देश खेळाडुंना आधीच दिलेले असतात. दरम्यान, वेटलिफ्टिंग फेडरेशनने वेटलिफ्टरवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी काही खेळाडुंवर अशी कारवाई झाली होती. कॉमनवेल्थ आणि युवा ऑलिम्पिक चॅम्पियन जेरेमी लालरिनुंगा यालाही शिस्तभंगामुळे कॅम्पमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.