मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात मॅथ्यू वेड संतापलेलं रूप प्रेक्षकांनी पाहिलं. अंपायरने वादग्रस्तरित्या आऊट दिल्यानंतर मॅथ्यू वेडने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन जोरात हेल्मेट फेकलं शिवाय बॅट दोनवेळा जमिनीवर आपटत राग व्यक्त केला. दरम्यान मॅथ्यू वेडचं हे अशोभनिय वागणं त्याला महागात पडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व प्रकारानंतर मॅथ्यू वेडवर कारवाई करण्यात आली आहे. वेडने केलेल्या त्याच्या चुकीची शिक्षा मिळणं अपेक्षित होतं. अशात मॅच रेफरीने त्याच्यावर कारवाई केली आहे. 


मॅथ्यू वेडवर कारवाई


मॅथ्यू वेडने जी चूक केली आहे ती, कोड ऑफ कंटक्टच्या अंतर्गत पहिल्या लेवलची आहे. कोणताही खेळाडू लेवल 1 वर दोषी आढळून आला की, त्याच्यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मॅच रेफरीकडे असतो. सामना संपल्यावर त्याला मॅच रेफरीसमोर हजर करण्यात आलं. या ठिकाणी त्याने आपली चूक मान्य केली.


नक्की काय झालं?


आरसीबीचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल सामन्यातील सहावी ओव्हर टाकायला आला. वेडने या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात बॉल वेडच्या पॅडला लागला.


मॅक्सवेलने एलबीडबल्यूसाठी जोरदार अपील केली. अंपायरने त्वरित वेडला एलबीडबल्यू आऊट जाहीर केलं. मात्र वेडला अंपायरचा निर्णय मान्य नव्हता. बॉल ग्लोव्हजला लागल्याचा विश्वास वेडला होता. त्यामुळे वेडने अंपायरच्या आव्हान घेत रिव्हीव्यू घेतला.मात्र या रिव्हीव्यूमध्ये वेडच्या ग्लोव्हजला बॉल लागल्याचं स्पष्ट झालं नाही. वेड स्टंपच्या टप्प्यात सापडल्याने त्याला आऊट देण्यात आलं.



वेड संतापला


वेडला थर्ड अंपायरने लाल दिव्याद्वारे आऊट असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे वेड हताश आणि संतापलेला दिसला. वेड नकारात्मक पद्धतीने मान हळवत ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला. वेडने ड्रेसिंग रुममध्ये पोहचताच हेल्मेट वेगात फेकून दिलं. तसंच 2 वेळा बॅट जमिनीवर आपटली. वेडच्या या ड्रेसिंग रुममधील संतापलेला अवताराचा व्हीडिओ सोशल माीडियावर व्हायरल झालाय.