मुंबईच्या टीममध्ये पॅट कमिन्सऐवजी या फास्ट बॉलरची निवड
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सला दुखापत झाल्यामुळे मुंबईच्या टीमला मोठा धक्का बसला होता.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सला दुखापत झाल्यामुळे मुंबईच्या टीमला मोठा धक्का बसला होता. आता पॅट कमिन्सऐवजी मुंबईनं नव्या खेळाडूची निवड केली आहे. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर अॅडम मिलनेला मुंबईच्या टीममध्ये घेण्यात आलं आहे. मिलनेनं आत्तापर्यंत ४० वनडे आणि १९ टी-20 मॅच खेळल्या आहेत. मिलने याआधी बंगळुरुकडून खेळला होता.
मुंबईला विजयाची प्रतिक्षा
सुरुवातीच्या तिन्ही मॅचमध्ये मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता मंगळवारी मुंबईचा सामना विराट कोहलीच्या बंगळुरूशी होणार आहे. या मॅचमध्ये जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये अंक मिळवण्याचं आव्हान मुंबईच्या टीमपुढे असणार आहे. मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. मुंबईनं तिन्ही मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये हरल्या. वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होणार आहे.
बंगळुरुचीही सुरुवात खराब
मुंबईप्रमाणेच या स्पर्धेमध्ये बंगळुरुचीही सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. बंगळुरूनं त्यांच्या तीनपैकी फक्त एकच मॅच जिंकली आहे. मुंबई आणि बंगळुरुच्या टीममध्ये आक्रमक बॅट्समन आहेत.