डेहराडून : अफगाणिस्तानने तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये आयर्लंडचा ३२ रननी पराभव केला आहे. या विजयासोबत तीन टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये अफगाणिस्तानने आयर्लंडचा ३-० अशा एकतर्फी फरकाने सुपडासाफ केला आहे. या मॅचचा खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरला तो म्हणजे मोहम्मद नबी आणि राशिद खान. मोहम्मद नबीने धडाकेदार ८१ रनची खेळी केली. तर स्पिनर राशिद खान याने हॅट्रिक घेतली. राशिद खाननं या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राशिद खानने हॅट्रिक घेण्याची कामगिरी ही एकाच ओव्हर मध्ये केली नाही. त्याने मॅचच्या १५ ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एक विकेट तर १७ व्या ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलमध्ये दोन विकेट घेण्याची कामगिरी केली. अफगाणिस्ताननं या मॅचमध्ये टॉस जिंकून आयर्लंडला बॅटिंगची संधी दिली. 


बॅटिंगसाठी आलेल्या अफगाणिस्तानच्या टीमने २० ओव्हरमध्ये २१० रन केल्या. मोहम्मद नबी याने सर्वाधिक ८१ रन केले. तर ओपनर हजरत्तुला झाझाईने ३१ रनची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता कोणत्याच अफगाणिस्ताच्या खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. अफगाणिस्ताच्या इनिंगला चांगली सुरुवात झाली. हजरत्तुला झाझाई आणि उस्मान घाणी या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४६ रनची भागीदारी केली. यानंतर ठराविक टप्प्याने विकेट जात होते. आयर्लंडकडून  बॉयड रैंकिन याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.


अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या २११ रनचे पाठलाग करायला आलेल्या आयर्लंडलची चांगली सुरुवात झाली होती, पण त्यांची पहिली विकेट ३२ रन असताना गेली. पॉल स्टर्लिंग १० रन करुन आऊट झाला. यानंतर आलेल्या एंडी बालबिर्नीच्या सोबतीने केविन ओब्रायननं आयर्लंडचा डाव सावरला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९६ रनांची महत्वपूर्ण भागीदारी झाली. या भागीदारीने टीमच्या डाव सावरला. टीमचा स्कोअर १२८ असताना एंडी बालबिर्नी ४७ रन करुन आऊट झाला. यानंतर आयर्लंडची टीम पत्त्यासारखी कोसळली. एकापाठोपाठ एक विकेट जाऊ लागले. अफगाणिस्तानचा स्पीनर राशीद खानने हॅट्रिक घेत आयर्लंडच्या विजयाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. आयर्लंडला २० ओव्हरमध्ये ८ विकेटच्या मोबदल्यात १७८ रन करत्या आल्या.


अफगाणिस्तानकडून सर्वाधिक ५ विकेट घेण्याची कामगिरी राशिद खानने केली. त्याने हॅट्रिक घेतली. त्याने ४ ओव्हरमध्ये २७ रनच्या मोबदल्यात ५ विकेट मिळवल्या.