मुंबई : अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नजीबुल्लाह तरकाई याचा अपघाती मृत्यू झाला आहे. २९ वर्षीय खेळाडूचं शुक्रवारी रस्ते अपघातात प्रचंड जखमी झाले. यामध्ये त्याची प्रकृती गंभीर होती. या फलंदाजाने रुग्णालयात उपचारा दरम्यान आपले प्राण सोडले. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा सलामी फळीतला फलंदाज नजीब तरकाई याच्या निधनाची बातमी अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने ट्विट करून दिली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने ट्विटमध्ये म्हटलंय की,'एसबी आणि क्रिकेट प्रेमींनी अफगाणिस्तानाची आक्रमक सलामी फलंदाज आणि उत्तम व्यक्तीमत्व असलेल्या नजीब तरकाई याला आपण गमावलं आहे. एका अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आम्ही स्तब्ध आहोत.'


नजीबने अफगाणिस्तानच्या संघाकडून एक वन-डे सामना आणि १२ टी-२० सामने खेळले होते. २०१४ साली टी-२० विश्वचषकादरम्यान नजीबने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. २०१७ साली मार्च महिन्यात आयर्लंडविरुद्ध टी-२० सामन्यात केलेल्या ९० धावा ही नजीबची सर्वोत्तम धावसंख्या होती. २०१९ साली बांगलादेशविरुद्ध तो आपला अखेरचा सामना खेळला. नजीबच्या निधनामुळे अफगाणी क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.