अफगाणिस्तानने अंडर-१९ क्रिकेटमध्ये रचला इतिहास
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी टीम असलेल्या अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी टीम असलेल्या अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे.
आशिया कप जिंकला
अंडर १९ आशिया कप क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन्स बनून अफगाणिस्तानने इतिहास घडविला आहे. क्वालालंपुर येथे झालेल्या अंतिम सामन्यात टीमने पाकिस्तान संघाचा पराभव केला.
पाकिस्तानचा मोठा पराभव
अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 185 धावांनी मोठा पराभव केला. अफगाणिस्तानकडून इकराम फैजीने 105 रन्स केले तर मुजीब जदरानने 5 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने टॉस जिंकत अफगाणिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. अफगाणिस्तानने 248 धावां केल्या त्यासाठी त्यांनी 7 विकेट्स गमावल्या. बदल्यात पाकिस्तानने 22.1 षटकात फक्त 63 धावा केल्या आणि ऑलआऊट झाली.
पाकिस्तानची टीम ढासळली
अफगाणिस्तानकडून फैजी व्यतिरिक्त, सलामीवीर रहमान गुल (40) आणि इब्राहिम झरदार (36) यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. संघाने 50 षटकात सात गडी गमावून 248 धावा केल्या. पाकिस्तानकडून 3 बळी घेत मोहम्मद मूसा हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. विजयासाठी 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची संपूर्ण टीम ढासळली.