PAK vs AFG World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानने इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना पाणी पाजून एतिहासिक पराक्रम केला आहे. आम्ही अफगाणी लोकांच्या आनंदासाठी खेळतोय, असं म्हणत अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी सर्वांची मनं जिंकली आहेत. आपल्या दिमाखदार कामगिरीमुळे अफगाणिस्तानचे खेळाडू देखील आनंदात असल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानला लोळवल्यानंतर आता अफगाणीस्तानच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये (Afghanistan Dressing room Video ) जल्लोष केला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. (Afghanistan team grooves to Lungi Dance after winning against Pakistan Dressing room Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणी खेळाडूंना बॉलिवूडची भलतीच क्रेझ आहे. राशीद खानने भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण याच्यासोबत मैदानावर डान्स केला होता. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये देखील अफगाणिस्ताने विजयोत्सव साजरा केला. त्यावेळी राशीदसह टीमच्या खेळाडूंनी शाहरूख खानच्या लुंगी डान्सवर ठुमके लगावले. बसमध्ये देखील अफगाणी खेळाडू नाचत असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून समजतंय.


आणखी वाचा - Shoaib Akhtar ची भविष्यवाणी ठरली खरी! तिसऱ्या पराभवानंतर कॅप्टन बाबरला दिला 'हा' टोकाचा सल्ला


पाकिस्तानने पहिली फलंदाजी करत सात विकेट गमावत 282 धावा केल्या. विजयाचं हे आव्हान अफगाणिस्तानने 49 व्या षटकात 2 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे आता अफगाणिस्तान संघाने 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 


पाहा Video




दरम्यान, गेल्या दोन-तीन वर्षांपासून आपण जे दर्जेदार क्रिकेट खेळत आहोत, तो विश्वास आशिया चषक खेळतानाही होता. स्पर्धेच्या सुरुवातीला मी म्हणालो होतो की, आम्हाला ही स्पर्धा आमच्या देशासाठी ऐतिहासिक बनवायची आहे, असं अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शैदी याने म्हटलं आहे. अफगाणिस्तानचा पुढील सामना 30 ऑक्टोबरला पुण्यात श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.