AFG vs BAN : `या` दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी ठरली तंतोतंत खरी, राशीद खानने पूर्ण केला दिलेला शब्द
Afghanistan vs Bangladesh : अफगाणिस्तान टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचेल अशी भविष्यावाणी एक दिगग्ज खेळाडूने केली होती त्याचीच आठवण राशीदने सांगितली.
Rashid khan On Brian Lara Prediction : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर झाल्याचं पहायला मिळालं. अफगाणिस्तान संघाने बांग्लादेशचा पराभव करत थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली आहे. अफगाणिस्तानने रोमांचक सामन्यात बांग्लादेशवर 8 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचेल यावर कोणाचाही विश्वास नव्हता पण अफगाणी खेळाडूंनी करून दाखवलं. फिरकीच्या जोरावर अफगाणी खेळाडूंनी जगजेत्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा पराभव केलाय. अशातच आता एका महान खेळाडूची भविष्यवाणी खरी ठरली आहे. अफगाणिस्तानचा कॅप्टन राशीद खान याने सामना संपल्यानंतर यावर प्रकाश टाकला.
विजयानंतर राशीद खान भावूक झाला. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला की, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचण्याचा अंदाज एका दिग्गजांनी वर्तवला होता. ज्याने आमच्यावर विश्वास दाखवला तो होता ब्रायन लारा... राशीदने यावेळी स्वागत पार्टीचा किस्सा सांगितला.
काय म्हणाला Rashid Khan?
एक टीम म्हणून सेमीफायनल गाठण आमच्यासाठी स्वप्नासारखं आहे. आम्ही टूर्नामेंटची सुरुवात कशी केली आहे यावर सर्व काही आहे, असं मला वाटतं. न्यूझीलंडला हरवल्यावर हा आत्मविश्वास आला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा पराभव आणि सेमीफायनल गाठणं अविश्वसनीय आहे. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. अफगाणिस्तानातील प्रत्येकजण या मोठ्या यशाने खूप आनंदी आहे, अशा भावना राशीदने व्यक्त केल्या. त्यावेळी त्याने ब्रायन लाराची आठवण काढली.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेयालिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, तौहिद ह्रदोय, शकिब अल हसन, महमुदुल्ला, सौम्या सरकार, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.