नवी दिल्ली : अफगानिस्तान क्रिकेट टीमचा स्टार स्पिनर राशिद खान याने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे तो वन-डे क्रिकेट रॅकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचला आहे.


अव्वल स्थान गाठलं मात्र...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राशिद खान याने अव्वल स्थान गाठलं आहे. मात्र, टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह याच्यासोबत त्याला अव्वल क्रमांक शेअर करावा लागत आहे.


बुमराह आणि राशिद खान एकत्र


झिम्बाब्वे विरोधात झालेल्या सीरिजमध्ये १६ विकेट्स घेणारा राशिद खान वन-डे रँकिंगमध्ये बुमराहसोबत संयुक्तरित्या क्रमांक एकवर आहे. बुमराह आणि राशिद खान या दोघांचेही गुण ७८७ आहेत. 


राशिदच्या नावावर एक नवा रेकॉर्ड


यासोबतच राशिद खानने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कमी वयात आयसीसी वन-डे रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवणारा राशिद पहिला क्रिकेटर बनला आहे. राशिदने १९ व्या वर्षात आणि १५२ दिवसांत अव्वल स्थान गाठलं आहे.


सकलेन मुश्ताकचा रेकॉर्ड मोडला


यापूर्वी हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताक याच्या नावावर होता. सकलेन मुश्ताकने २१ वर्ष आणि १३ दिवसांचा असताना अव्वल क्रमांक गाठला होता.


राशिदने आपल्या शेवटच्या १० मॅचेसमध्ये ७.७६च्या सरासरीने ३३ विकेट्स घेतले. या दरम्यान त्याने प्रत्येक इनिंगमध्ये २ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतले आहेत.



द्विपक्षीय सीरिजमधअये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत राशिद तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, पहिल्या क्रमांकावर अमित मिश्रा आहे. त्याने २०१३ मध्ये झिम्बाब्वे विरोधात १८ विकेट्स घेतले होते. दुसऱ्या क्रमांकावर कुलदीप यादव असून त्याने आफ्रिकेविरोधात १७ विकेट्स घेतले. तिसऱ्या क्रमांकावर राशिद खान असून त्याने झिम्बाब्वे विरोधात १६ विकेट्स घेतले आहेत.