काबुल :  गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट जगतात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. आता एका अफगाणी खेळाडूने असा कारनामा केला आहे की त्याची पुनरावृत्ती होणे अशक्य नाही पण खूप अवघड आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शफिकुल्लाह शफाक या विकेटकिपर फलंदाजने एका स्थानिक सामन्यात एक जबरदस्त विक्रम बनवला आहे. असा विक्रम कोणी बनवू शकलेला नाही. शफाक याने टी-२० सामन्यात द्विशतक लगावला आहे. 


 



पारागांव नांगरहार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यात शफाक याने ७१ चेंडूत २१४ धावा कुटल्या. यात त्याने २१ षटकार आणि १६ चौकार लगावले. यासामन्यात खतीज क्रिकेट अकादमीने २०षटकात ३५१ धावांचा विशाल स्कोअर बनावला.  शफाक सोबत वहीदुल्लाह यांने ३१ चेंडुत ८१ धावा काढून चांगली साथ दिली.  


३५१ धावांचा सामना करताना काबुल स्टार क्रिकेट केवळ १०७ धावा काढू शकले. शफाक याने आपल्या टी २० आंतरराष्ट्रीय करीअरमध्ये ३५ सामने खेळले आहेत. त्यात ३९२ धावा केल्या आहेत.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक ५१ धावा केल्या आहेत.