दुबई : पाकिस्तानने बुधवारी आशिया कपमध्ये टी-20 स्पर्धेतील सुपर फोर सामन्यात अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव करत अंतिम फेरीतील तिकीट निश्चित केलं. या सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये खूप तणावाचं वातावरण होतं. अगदी मैदानावर खेळाडू एकमेकांशी भिडले. एवढंच नाही तर हा सामना संपल्यानंतर स्टँडवरही गोंधळ झालेला पाहायला मिळाला. या पराभवानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तानच्या चाहत्यांनाही मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.


अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी घातला गोंधळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सामना शेवटपर्यंत रोमहर्षक झाला. या सामन्यात खेळाडूंपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांना राग अनावर झाला. या सामन्यानंतर स्टँडवरून एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये अफगाणिस्तानचे चाहते तोडफोड करताना दिसले. यावेळी चाहत्यांनी खुर्च्या फेकल्या. याशिवाय अफगाणिस्तानच्या लोकांनी मैदानाबाहेर बसलेल्या पाकिस्तानी चाहत्यांवरही हल्ला केला आणि त्यांच्यावर खुर्च्याही फेकल्या. दरम्यान या घटनेचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.



खेळाडूही एकमेकांशी भिडले


या सामन्यादरम्यान गदारोळ झाला. सामन्यादरम्यान दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना भिडले. पाकिस्तानच्या बॅट्समनने आऊट झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या बॉलरवर बॅट उगारली. 


नेमकं प्रकरण काय?


19 व्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमदने आसिफ अलीला (Asif Ali) मोक्याच्या क्षणी आऊट केलं. आसिफ आऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रुमच्या दिशेने जात होता. तेव्हाच फरीद आसिफला आऊट केल्याचा जल्लोष करत होता. त्यामुळे आसिफ चिडला. त्यामुळे आसिफने आधी फरीदला धक्का मारला. त्यानंतर अंगावर बॅट उगारली. यानंतर पंचानी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवळला. मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा रडीचा डाव समोर आला.