अव्वल स्थान हिरावणाऱ्या खेळाडूसोबत विराट कोहली खेळणार?
विराट कोहली आणि बाबर आझम एकाच टीममधून खेळणार?
मुंबई : भारत पाकिस्तान म्हणजे एकमेकांविरुद्ध नुसतं क्रिकेट नाही तर देशप्रेमांपर्यंत सामना जातो. आता भारत आणि पाकिस्तान टीममधील खेळाडू एकाच टीममधून खेळणार असल्याची चर्चा आहे. 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटपटू एफ्रो-आशिया कपच्या रीबूट हंगामात खेळताना दिसतील.
2005 आणि 2007 नंतर आफ्रो-आशिया कप खेळवण्यात आला नाही. भारत आणि पाकिस्तान 2012/13 पासून द्विपक्षीय मालिका खेळलेले नाहीत आणि 2007 पासून कसोटी मालिकेत आमनेसामने आलेले नाहीत.
दोन्ही संघ आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) वगळता फक्त ICC स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर आहेत. Forbes.com मधील एका अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू जून-जुलै 2023 मध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये परतणाऱ्या आफ्रो-आशिया कपसह एकाच संघात खेळू शकतात. ही स्पर्धा कधी आणि कुठे होणार याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
एफ्रो एशिया कपमध्ये पाकिस्तान आणि भारतीय टीममधील खेळाडू एकत्र खेळातना दिसू शकतात. रोहित शर्मा विराट कोहली आणि बाबर आझम एकाच टीममधून खेळताना दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खेळा आणि राजकारण एकमेकांपासून दूर ठेवावं ही आशा आहे असं बीसीसीआयच्या सचिवांनी म्हटलं आहे.
आफ्रो-आशिया चषक हा वार्षिक कार्यक्रम बनवण्याची आणि सहयोगी देशांतील खेळाडूंना संधी देण्याची योजना आहे. एसीसी आशिया कपसाठी पात्र होण्यासाठी या स्पर्धेव्यतिरिक्त, 16 वर्षाखालील, 19 वर्षाखालील एफ्रो-आशिया कप, 19 वर्षांखालील महिला आशिया कप, 13 वर्षाखालील आणि 16 वर्षांखालील आशिया ज्युनियर कप आणि असोसिएट्ससाठी ACC वेस्ट आणि ईस्ट कप सुरू करण्याचाही विचार असल्याचं म्हटलं आहे.