मुंबई : स्टार खेळाडू आणि फुटबॉलचा देव मानला जाणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या चाहत्यांसाठी फार मोठी बातमी आहे. लिओनेल मेस्सी एफसी बार्सिलोना टीम सोडणार आहे. मेस्सी आणि बार्सिलोना फुटबॉल क्लबमध्ये नवा करार होऊ शकलेला नाही. यामुळे मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यातील 21 वर्षांचं नातं अखेर संपुष्टात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फुटबॉल क्लब बार्सिलोनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. बार्सिलोनाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना यांच्यात नवीन करार झालेाला शकला नाही. स्पॅनिश लीगा नियमांनुसार हा करार होऊ शकलेला नाही. परिणामी मेस्सी एफसी बार्सिलोनामध्ये यापुढे राहणार नाही."


मेस्सी आणि क्लबच्या इच्छा पूर्ण होऊ शकणार नाहीत. या गोष्टीचा दोघांनाही खेद आहे. एफसी बार्सिलोना टीम मेस्सीच्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. दरम्यान मेस्सीच्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनासाठी आणि भविष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा, असंही निवेदनात म्हटलं आहे.


अवघ्या वयाच्या 13व्या वर्षापासून मेस्सी बार्सिलोना क्लबच्या टीमकडून खेळत आहे. 4 वर्षे ट्रेनिंग घेतल्यानंतर मेस्सीने बार्सिलोनाच्या सिनियर टीमसोबत खेळण्यास सुरुवात केली होती. या 17 वर्षांमध्ये मेस्सी तब्बल 35 किताब आपल्या नावे केले आहेत.


बार्सिलोना क्लबकडून खेळताना लिओनेल मेस्सीने 778 सामन्यात एकूण 672 गोल केले आहेत. तर 305 असे उत्तम असिस्ट केले आहेत. पाचवेळा फीफा प्लेअर ऑफ द इअर असलेल्या मेस्सीने 2017 या वर्षी नव्याने करार केला होता. हा करार 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आला होता. 


यापूर्वी जेव्हा मेस्सीने क्लब सोडण्याची इच्छा वर्तवल्यानंतर टीमवर त्याचे परिणाम दिसून आलेले. चॅम्पियन लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत बायर्न म्युनिच टीमकडून 8-2 ने पराभव सहन करावा लागला होता. मेस्सीच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा पराभव मानला जातो.