कोट्टायम : फिफा वर्ल्डकप २०१८ मध्ये क्रोएशियाविरूद्ध अर्जेंटीनाला ०-३ अशी हार खावी लागली. यामुळे निराश झालेल्या मेसीच्या चाहत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी एका नदीतून त्याची डेड बॉडी बाहेर काढण्यात आली. ३० वर्षांचा दीनू एलेक्स शुक्रवारी अरूमानूर येथून गायब झाला होता. मेसीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अर्जेंटीनाचा सामना पाहताना तो शेवटचा दिसला होता. शनिवारी सकाळी इलिक्कल नदीतून त्याचे शव बाहेर काढण्यात आले असून नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्याच्या रुममधून एक सुसाइड नोट पोलिसांना सापडली. 'या जगात मला बघण्याारख काही राहिलं नाहीए. मी जातोय..माझ्या मृत्यूला कोणी कारणीभूत नाहीए.' असं त्यावर लिहिलं होतं.


मेस्सीसाठी वेडा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीनू एक स्वत:मध्ये गुंतून राहणारा व्यक्ती होता तसेच त्याचे खूप कमी मित्र होते. तो फुटबॉलच्या सर्व मुख्य मॅच फॉलो करत होता. मेस्सीसाठी तो वेडा होता. 'मेस्सी, माझ जीवन तुझ्यासाठी आहे. तुला कप उचलताना पाहायचाय.' असं त्याने आपल्या पुस्तकात लिहिले होते. एका खासगी फर्ममध्ये तो अकाऊंटंट म्हणून कार्यरत होता. मेसीच्या गोलमुळे अर्जेंटीना जिंकेल असे त्याने आपल्या ऑफिस सहकाऱ्याला सांगितले होते.


घरून गायब 


आपल्या आईवडिलांसोबत घरी बसून तो मॅच बघत होता. मॅच नंतर काही मित्रांनी त्याला फोन केला होता. सकाळी ४.३० वाजता त्याच्या आईने पाहिले तर तो घरी नव्हता. शोधाशोध करूनही न सापडल्याने घरच्यांनी अयस्कुनम पोलिसात तक्रार केली.अर्जेंटिनाची जर्सी, मोबाइल फोन कव्हर अशा वस्तू त्याच्या रुममध्ये सापडल्या.