IPL 2024: आयपीएलच्या 62 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात बंगळूरूने दिल्लीचा 47 रन्सने पराभव केला. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या प्लेऑफ गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याशिवाय दुसरीकडे दिल्लीला प्लेऑफ गाठणं काहीसं कठीण दिसतंय. यंदाच्या सिझनमधील दिल्ली कॅपिटल्सचा हा सातवा पराभव होता. या पराभवानंतर कर्णधार अक्षर पटेल काय म्हणाला ते पाहुया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर्स विरूद्धच्या सामन्यात एका मॅचची बंदी असल्यामुळे ऋषभ पंत खेळू शकला नाही. यावेळी टीमच्या कर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली होती. मात्र या सामन्यात दिल्लीला 47रन्सने पराभवाचा सामना कराला लागला. 


अक्षर पटेलने सांगितलं पराभवाचं कारण


अक्षर पटेलच्या मते, खराब फिल्डींगमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला. दिल्लीच्या टीमने 3 ओव्हर्समध्ये 4 कॅच सोडले. मुख्य म्हणजे यामध्ये अक्षरने स्वतः दोन कॅच सोडले. यावेळी सामना संपल्यानंतर अक्षर म्हणाला, 'कॅच सोडल्यामुळे आमचं नुकसान झाले. असं झालं असतं तर विरोधी टीमला 150 रन्सपर्यंत रोखता आलं असतं. 


अक्षर पटेलने सांगितले की, बॉल पीचवर काहीसा थांबून येत होता. 160-170 हा स्पर्धात्मक स्कोर असतो. काही बॉल थांबून येत होते. ज्यावेळी तुमचे प्रमुख रनआऊट होतात आणि तुम्ही पॉवरप्लेमध्ये चार विकेट गमावता तेव्हा सामना कठीण होतो. सामन्यात काहीही होऊ शकतं, मात्र जास्त पुढच्या गोष्टींचा विचार केला नाही. 


आरसीबीकडून दिल्लीचा पराभव


आरसीबीच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अक्षरचे अर्धशतक झळकावलं. यावेळी शाई होप (29) सोबत पाचव्या विकेटसाठी केलेल्या 56 रन्सची अर्धशतकी खेळी असूनही दिल्लीची टीम 19.1 ओव्हर्समध्ये 140 रन्समध्ये ऑलआऊट झाली. दुसरीकडे आरसीबीकडून रजत पाटीदार आणि विल जॅक यांनी तिसऱ्या विकेटसाठी 88 रन्सची भागीदारी केली. ज्यामुळे आरसीबीने नऊ विकेट्सवर 187 रन्स केले. 


प्लेऑफ कशी गाठणार आरसीबीची टीम?


एकीकडे आरसीबीने प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या असून दुसरीकडे दिल्लीने जवळजवळ पॅकअप केलंय. आरसीबीने 13 सामने खेळले असून त्यांना अखेरचा सामना चेन्नईविरुद्ध खेळायचा आहे. जर आरसीबी चेन्नईविरुद्ध चांगल्या मार्जिनने जिंकली तर आरसीबी प्लेऑफच्या लक्ष्मण रेषेवर पोहोचेल. मात्र, त्याआधी हैदराबाद आणि लखनऊला प्रत्येकी एका सामन्यात पराभव पत्करावा लागणार आहे. जर या तिन्ही पराक्रम घडले तर आरसीबीला प्लेऑफचं तिकीट मिळू शकतं.