IND vs ENG: फ्लॉपशोनंतर प्रेक्षकांची नाराजी सांभाळून Virat Kohli चा रेकॉर्डचा पाऊस
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या नावावर रेकॉर्डची लिस्ट
मुंबई : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी- 20 सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाबाद 73 धावा केल्या. विराटच्या या खेळीमुळे भारताने दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्य़ा 7 गडी राखून विजय मिळवला. यासह आता ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. मागच्या काही सामन्यात विराट कोहलीच्या चुकीच्या फॉर्ममुऴे जगभरात टीका झाली. पण या सामन्यात विराटने सर्वांचे तोंड बंद करत अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत.
विराटच्या नावे काय आहेत रेकॉर्ड?
3 हजार धावा करणारा पहिला खेळाडू विराट कोहली.
टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वप्रथम 3 हजार धावा करण्याचा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे झाला आहे. विराटने आता 86 टी -20 सामन्यात 3001 धावा केल्या आहेत. इतकेच नाही तर टी -20 मध्ये सर्वात जलद 1 हजार आणि 2 हजार धावा करण्याचा विक्रमही विराटने आपल्या नावे केला आहे.
12 हजार धावा करणारा सर्वाधिक वेगवान कर्णधार विराट कोहली
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 12 हजार धावा करणारा कर्णधारही ठरला आहे. विराटने भारताचा कर्णधार म्हणून 226 व्या डावात 12 हजार धावा पूर्ण केल्या. यासह विराटने रिकी पाँटिंग (282 डाव) आणि ग्रॅमी स्मिथ (294 डावा) मागे सोडत सर्वात वेगवान कर्णधार ठरला आहे.
विराटच्याच नावावर सर्वाधिक अर्धशतक.
टी -20 क्रिकेटसामन्यात सर्वाधिक अर्धशतक करणारे विराट कोहली यांच्या नावे आता 26 अर्धशतके आहे. तर दुसर्या क्रमांकावर टीम इंडियाचे रोहित शर्मा असून त्याच्या नावावर 25 अर्धशतके आहेत.
इंग्लंडविरुद्ध सामन्यात अर्धशतक करणारा पहिला कर्णधार विराट कोहली.
इंग्लंडविरुद्ध टी -20 क्रिकेटमध्ये सामन्यात अर्धशतक करणारे विराट कोहली पहिला कर्णधार ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारताने आतापर्यंत 16 टी -20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये दोन्ही संघांनी 8-8 असा विजय मिळवला आहे.
जगातील सर्वात चांगला फलंदाज
लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली हा जगातील सर्वात चांगला फलंदाज म्हणून ओऴख निर्माण केली आहे.टी -20 सामन्यात विराटने 29 डावांमध्ये 1408 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने एकूण 14 अर्धशतके ठोकली आहेत. तर त्याची सरासरी 108.30 आहे.