मुंबई  : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अनेक दिवसापासून फॉर्म आणि फिटनेसच्या अडचणीत आहे. हार्दिक पांड्या याने मागील अनेक दिवसांपासून बॉलिंग केलेली नाही. यामुळे हार्दिक पांड्याच्या टीम इंडियामधील जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हार्दिक पांड्याच्या खराब परफॉर्मला कंटाळून टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने पांड्याला टीमच्या बाहेर केलं, पण आता टीम इंडियाला पांड्या पेक्षाही घातक प्लेअर मिळालेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला व्यंकटेश अय्यरच्या माध्यमातून हार्दिक पांड्यापेक्षाही स्पर्धक टीमसाठी घातक प्लेअर मिळाला आहे. या खेळाडूने अतिशय कमी वेळात टीम इंडियावर आपल्या खेळाची छाप सोडली आहे.



व्यंकटेश अय्यरने आतापर्यंत २ वनडे आणि ६ टी २० इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. व्यंकटेश अय्यर आयपीएल आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केल्याने चर्चेत आहे. 


व्यंकटेश अय्यर हा बॅटिंगच नाही, बॉलिंगही घातक करतो. वेस्टइंडिज विरुद्ध ३ सामन्यात टी२० मालिकेत २७ वर्षाच्या व्यंकटेश अय्यरने अतिशय फटकेबाज बॅटिंग केली. व्यंकटेश अय्यरने ३ सामन्यात टी २० मालिकेत १८४ स्ट्राईक रनरेटने ९२ रन बनवले.


या दरम्यान त्याने १० चौकार आणि ४ षटकार लगावले, ओव्हरऑल टी २० क्रिकेटमध्य अय्यर १ हजार ३७७ रन बनवले आहेत. व्यंकटेश अय्यर याने ७ अर्धशतक देखील काढले आहेत. व्यंकटेश अय्यरने १३६ चौके आणि ५० षटकार लगावले. व्यंकटेश अय्यरचा इकॉनॉमी रेट देखील ७ पेक्षा कमी आहे.


बॉलिंग करताना व्यंकटेश अय्यरने ४१ डावात २३ च्या सरासरीने ३२ विकेट घेतल्या. २ रन देऊन २ विकेट हे व्यंकटेशचं सर्वात बेस्ट प्रदर्शन आहे.


याआधी टी २० मुश्ताक अली ट्रॉफीत व्यंकटेश अय्यरने ५ डावात ५२ च्या सरारीने १५५ रन्स केले होती, आणि बोलिंग करताना व्यंकटेश अय्यरने १७ च्या सरासरीत ५ विकेट देखील घेतले. व्यंकटेश अय्यरची इकोनॉमी ६ पेक्षा कमी होती.