बंगळूरू : इंडियन प्रिमियर लीगच्या आगामी सिझनची तयारी जोरदार सुरु आहे. त्यासाठी आज आणि उद्या मेगा ऑक्शन होणार आहे. बंगळुरूमध्ये होणारा हा लिलाव दोन दिवस चालणार आहे. पुढील सिझनमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन टीम्सचा समावेश होणार आहे. अशा परिस्थितीत आयपीएल 2022 चा सिझन खूप रोमांचक असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमधील जुन्या 8 टीम्सच्या नियमांनुसार 4-4 खेळाडूंना आधीच कायम ठेवण्यात आलं आहे. तर काही टीम्सने दोन तर काही टीम्सने केवळ तीन खेळाडूंना कायम ठेवलंय. तर दोन नवीन टीम्सने 3-3 खेळाडू घेतले आहेत. त्यामुळेच या मेगा लिलावात काही जुने आणि युवा खेळाडू मोठ्या प्रमाणात मालामाल होणार आहे.


केकेआर आणि पंजाब नव्या कर्णधाराच्या शोधात


दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) टीम देखील नवीन कर्णधाराच्या शोधात आहेत. केकेआरसाठी गेल्या मोसमात, इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन आणि केएल राहुलने पंजाबचं नेतृत्व केलं होतं. केकेआरने मॉर्गनला रिटेन केलं नाही. तर केएल राहुल पंजाब सोडून लखनऊच्या टीममध्ये सामील झाला.


आरसीबीलाही हवाय नवा कर्णधार


विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूदेखील दमदार कर्णधाराच्या शोधात आहे. आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलला रिटेन केलं आहे त्यामुळे फ्रेंचायझी त्याला कर्णधारपद देणार असल्याची चर्चा आहे. तर सूत्रांच्या माहितीवनुसार, RCB मेगा लिलावात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर किंवा श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून खरेदी करू शकते.


याशिवाय कोलकाता आणि पंजाब टीमचीही नजर श्रेयस अय्यरवर राहणार आहे. दोन्ही फ्रँचायझी त्याला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी इच्छूक आहेत. श्रेयस हा मिडल ऑर्डरमध्ये उत्कृष्ट फलंदाज असून कर्णधारपदाची धुराही योग्य पद्धतीने सांभाळू शकतो. अय्यरने 2019 पर्यंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्वही केलं आहे.