India vs Australia : दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला (Team India) लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (Team india) 10 विकेट्सने पराभव केला. यासोबत ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया 1-1 अशी बरोबरी केली आहे. दरम्यान या पराभवामुळे टीम इंडियाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद झाली. तर या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियासाठी चांगलाच फायदेशीर ठरला. अवघ्या 117 रन्समध्ये टीम इंडियाचा ऑलआऊट झाला. कांगारूंचा मिचेल स्टार्क हा टीम इंडियासाठी कर्दनकाळ ठरला. 5 विकेट्स घेत स्टार्कने टीम इंडियाची दाणादाण उडवली. अवघ्या 26 ओव्हर्समध्ये टीमने सर्व फलंदाज पव्हेलियनमध्ये परतले.


फलंदाजांवर भडकला रोहित शर्मा


पराभवानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला. रोहित म्हणाला, जर तुम्ही सामना हरलात तर ते निराशाजनक आहे, आम्ही फलंदाजीमध्ये स्वतःला सिद्ध करू शकलो नाही. खराब फलंदाजीमुळे आम्ही पुरेसे रन्स केले नाहीत. ही 117 रन्सची विकेट नव्हती."


रोहित शर्मा म्हणाला, आम्ही पहिल्याच ओव्हरमध्ये शुभमन गिलची विकेट गमावली. त्यावेळी मी आणि विराटने 30-35 रन्स केलेले. मात्र यानंतर माझी विकेट गेली आणि आम्ही हळूहळू बॅकफूटवर गेलो. ती परिस्थिती अशी होती, जिथे आम्ही कमबॅक करू शकलो नाही.


जर तुम्ही एखादा खेळ गमावला तर ते निराशाजनक आहे, आमच्या बॅटने स्वतःला न्याय दिला नाही आणि बोर्डला जोरदार फटका मारला नाही. ती 117 धावांची विकेट नव्हती. मी अपेक्षेपेक्षा खूपच निराश झालो. आम्हाला जे हल्ले व्हायचे होते ते आम्ही कधीही होऊ दिले नाहीत. जेव्हा आम्ही पहिल्या हाफमध्ये शुभमन गिलचीची विकेट गमावली, तेव्हा मी आणि विराटने 30-35 धावा केल्या होत्या. पण नंतर मी माझी विकेट गमावली आणि त्यानंतर आम्ही हळूहळू बॅकफूटवर गेलो आणि परत येऊ शकलो नाही.


स्टार्क एक उत्तम गोलंदाज- रोहित


रोहित शर्मा पुढे म्हणाला, स्टार्क हा एक उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. नवा बॉल स्विंग करणं हे त्याला जमतं. मुळात तो त्याच्या ताकदीने गोलंदाजी करत होता.