Jasprit Bumrah: रोहितनंतर आता ड्रेसिंग रूममध्ये बुमराह होतोय दुर्लक्षित? दुसऱ्याच गोलंदाजाचं झालं कौतुक
Jasprit Bumrah: पंजाबविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजांची चांगली कामगिरी पहायला मिळाली. बुमराहने या सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 21 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या.
Jasprit Bumrah: गुरुवारी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईच्या टीमने 9 रन्सने पंजाबच्या त्यांच्या घरातच पराभव केला. यानंतर नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले. या सामन्यात जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) उत्तम कामगिरी केली. पर्पल कॅप पटकावत बुमराहला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही देण्यात आला. मात्र टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये कुठेतरी बुमराह दुर्लक्षित होत असल्याचं दिसून आलं.
पंजाबविरूद्ध बुमराहचीही उत्तम कामगिरी
पंजाबविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजांची चांगली कामगिरी पहायला मिळाली. बुमराहने या सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 21 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या. सामना जिंकल्यानंतर मुंबईचे प्रशिक्षक मार्क बाऊचर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला बॅच देतात. मात्र पंजाबच्या सामन्यानंतर हा बॅच देण्याची वेळ आली तेव्हा, तो जसप्रीतला दिला गेला नाही. 4 ओव्हर्समध्ये 32 रन्स देत 3 विकेट्स घेणाऱ्या गेराल्ड कोएत्झीला देण्यात आला. याप्रसंगी बुमराहला टाळ्या वाजवताना पाहून चाहते काहीसे नाराज झाले. शिवाय बुमराहच्या चेहऱ्यावर देखील नाराजी दिसत होती. मुंबईच्या ड्रेसिंग रूमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jasprit Bumrah ला मिळाली पर्पल कॅप
पंजाब किंग्ज विरुद्ध मुल्लानपूरमध्ये झालेल्या झालेल्या सामन्यात जसप्रीत बुमराहची कामगिरी उत्कृष्ट होती. बुमराहने सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 21 रन्स देत 3 विकेट्स घेतले. सामन्यानंतर त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. यासह बुमराहने युझवेंद्र चहलला मागे टाकत पर्पल कॅप जिंकली. त्यामुळे आता या यादीत चहल दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. बुमराहने आतापर्यंत 7 सामने खेळले असून या कालावधीत त्याने एकूण 13 विकेट घेतल्या आहेत.
पंजाब विरूद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने केली कमाल
पंजाब विरूद्धच्या सामन्या मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जला 14 रन्सवर चार धक्के बसले होते. त्यानंतर पंजाब किंग्जला शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांच्यात मोठ्या पार्टनरशिपची आवश्यक होती. यावेळी आशुतोष आणि शशांक सिंग तुफान फलंदाजीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं होतं. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता. पंजाब किंग्जला शेवटच्या ओव्हरमध्ये 1 विकेट शिल्लक असताना विजयासाठी 12 रन्सची गरज होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिकने गोलंदाजीची जबाबदारी आकाश मधवालकडे सोपवली. यावेळी रोहित शर्माने सूत्री हाती घेत फिल्डींग लावली.
रोहित शर्माने मोहम्मद नबीला डीप कव्हरकडे फिल्डींगला पाठवलं. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल वाईड घोषित करण्यात आला पण त्याच्या पुढच्याच बॉलवर रबाडाने डीप कव्हरवर उभ्या असलेल्या नबीकडे बॉल खेळला. यावेळी दुसरा रन घेण्याच्या नादात आणि नबीच्या उत्तम फिल्डींगमुळे मुंबई इंडियन्सला सामना जिंकता आला.