मुंबई : भारतामध्ये श्रीलंकन टीमला धूळ चारल्यानंतर आता भारतीय  क्रिकेट संघ  दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. या दौर्‍यामध्ये भारतीय संघ तीन कसोटी, सहा वनडे आणि तीन टी २० मॅच खेळणार आहेत. भारतीय संघ  दक्षिण आफ्रिकेत पोहचला मात्र शिखर धवनला दुबईत थांबावे लागले.  


का रोखलं शिखर धवनला ?   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवनने एमरेट्स एअरलाईन्सवर आरोप केला आहे. धवनकडे त्याच्या मुलांचं बर्थ सर्टिफिकेट आणि पत्नी आयशा मुखर्जी यांच्या ओळखपत्राची मागणी केली. मात्र हे बरोबर पाहिजे याबाबतची माहिती यापूर्वी दिली नव्हती. त्यामुळे शिखर धवनला परिवारासोबत दुबईत रहावे लागले. 


शिखर धवनने एमरिट्सवरील राग ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला.  एअरलाईन्सच्या क्रु मेंबर्सचे वागणे वाईट होते. त्यानंतर एअरलाईन्सनेदेखील माफी मागितली. 


 केविन पीटरसननेदेखील भडकला




शिखर धवनच्यानंतर इंग्लंडचा खेळाडू केविन पीटरसननेदेखील एमरिट्स एअरलाईन्सवर नाराजी व्यक्त केली आहे. एमरिट्सचा फर्स्ट क्लास पेसेंजर आनी प्लॅटिनम कार्ड मेंबर असूनही योग्य सुविधा मिळत नसल्याने केविनही एमरिट्स एअरलाईन्सवर भडकला आहे.