रोहित शर्मा कर्णधार झाला तर, `या` 3 खेळाडूंची कारकीर्द धोक्यात?
यंदाच्या टी -20 वल्डकपनंतर रोहित शर्मा भारताचा पुढील वनडे आणि टी -20 कर्णधार होऊ शकतो.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने (Team India Captain Virat Kohli) टी 20 वर्ल्ड कप 2021 नंतर (T 20 World Cup 2021 ) आपली कॅप्टन्सी सोडणार आहे. स्वत: विराटने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे विराटनंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण असणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. सध्यातरी भावी कॅप्टन म्हणून रोहित शर्माचं नाव समोर येत आहे.
यंदाच्या टी -20 वल्डकपनंतर रोहित शर्मा भारताचा पुढील वनडे आणि टी -20 कर्णधार होऊ शकतो. प्रत्येक वेळा हे पाहायला मिळाले की, कर्णधाराच्या आगमनाने संघात मोठे बदल घडतात. त्यामुळे टीम इंडियामध्ये असे 3 खेळाडू आहेत, जे रोहित शर्मा टीमचा कर्णधार होताच आपले टीममधील स्थान गमवू शकता.
ऋषभ पंत
जर रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार झाला, तर युवा फलंदाज आणि विकेटकीपर इशान किशनला टी -20 आणि एकदिवसीय संघात संधी मिळू शकते. इशान किशन मुंबई संघात रोहित शर्मासोबत खेळतो, अशा स्थितीत रोहित कर्णधार होताच ऋषभ पंतची टीममधील जागा धोक्यात येऊ शकतात.
नवदीप सैनी
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचा टी -20, एकदिवसीय आणि कसोटी या तिन्ही प्रकारांमध्ये टीम इंडियाच्या संघात समावेश आहे. टीम इंडियामध्ये नवदीप सैनीला आतापर्यंत कोणतीही विशेष संधी मिळालेली नाही. जर रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार झाला, तर नवदीप सैनीऐवजी तो संघातील इतर कोणत्याही गोलंदाजाला संधी देऊ शकतो.
वॉशिंग्टन सुंदर
अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर विराट कोहलीच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. वॉशिंग्टन सुंदर आरसीबी संघात विराट कोहलीसोबत खेळतो. वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट, टी -20, वनडे आणि टेस्टमध्ये खेळतो. जर रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार झाला, तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कृणाल पंड्या किंवा जयंत यादवला संधी देऊ शकतो.