मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने T20 विश्वचषक सुरु होण्यापूर्वी मोठी घोषणा केली आहे. भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचे कोहलीने सांगितले होते. त्यामुळे विश्वचषकानंतर भारताला नवा कर्णधार मिळणार आहे. परंतु ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर येईल? यावरती सर्वत्र चर्चा सुरू आहे. सध्या कोहलीवर ज्या प्रकारची टीका होत आहे, त्यामुळे तो लवकरच एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद सोडू शकतो अशी ही चर्चा लोकांमध्ये रंगत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटनंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल हे पद घेण्यासाठी मोठे दावेदार आहेत. पण तरीही संघात एक असा खेळाडू आहे जो या दोघांचे स्वप्न भंग करून कर्णधार होऊ शकतो.


रोहित शर्मा नाही तर कोण कर्णधार होऊ शकतो?


टीम इंडियाचा युवा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतमध्येही नवा कर्णधार होण्याची पूर्ण क्षमता आहे. पंत अवघ्या 24 वर्षांचा आहे. वास्तविक पंतने आता भारतीय संघात आपली जागा प्रदीर्घ काळापासून निर्माण केली आहे. तो अजूनही तरुण आहे आणि त्याच्याकडे अजून एक दीर्घ कारकीर्द बाकी आहे. यामुळे तो कोणत्याही खेळाडूपेक्षा अधिक उपयुक्त ठरू शकतो.


रोहित-राहुलचे स्वप्न भंगणार?


खरंतर रोहित शर्माला नवा कर्णधार बनणं अवघड आहे , कारण तो आता 34 वर्षांचा आहे आणि तो विराट कोहली (32) पेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. अशा स्थितीत रोहित आता काही वर्षांनी निवृत्तीची घोषणा करू शकतो. दीर्घकाळाचा विचार करून रोहितला नवा कर्णधार बनवता येणार नाही, अन्यथा टीम इंडियासाठी नव्या कर्णधाराचा लवकरच शोध घ्यावा लागू शकतो, ज्यामुळे टीमचे सुत्र आणि समीकरण पुन्हा लगेच हदलावे लागू शकते. अशा परिस्थितीत रोहितपेक्षा पंत हा चांगला पर्याय ठरू शकतो.


दुसरीकडे, जर केएल राहुलबद्दल बोलायचे झाले तर, हा खेळाडू एक चांगला खेळाडू आहे, परंतु आयपीएलमध्ये असे दिसून आले आहे की, तो कर्णधारपद आणि खेळ एकत्रितपणे हाताळू शकत नाही. तो धावा करतो पण त्याच्या संघाला अजून यश मिळालेले नाही. त्याच वेळी, त्याचा स्ट्राइक रेट देखील खूप कमी होत आहे.


परंतु ऋषभ पंतने आयपीएल 2021 मध्येही  दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व उत्तम प्रकारे केले. दावेदार मानले जात होते, मात्र तो क्वालिफाय फेरीतून बाहेर झाले अनेक वेळा विकेटच्या मागून पंत ओरडत असतो आणि गोलंदाजांना योग्य दिशेने गोलंदाजी करण्यास सांगत असतो. माजी कर्णधार धोनीही अनेकदा असे करताना दिसला होता.


तो धोनी सारखा


ऋषभ पंतकडेही धोनीइतकीच ताकद आहे. 2007 मध्ये जेव्हा धोनीला टीम इंडियाचे कर्णधारपद देण्यात आले होते, तेव्हा त्याचा फायदा संघाला झाला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मैदानावरील कोणत्याही खेळाडूपेक्षा विकेटकीपरला खेळ जास्त कळतो, त्यामुळे पंतचा वापर धोनीप्रमाणे होऊ शकतो, हे सर्वांना माहीत आहे.