Virat Kohli 46 Century : भारतीय क्रिकेट संघात (indian Cricket team) चौफेर खेळी करत क्रिकेटप्रेमींच्या मनाचा ठाव घेणाऱ्या विराट कोहली यानं पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वळवल्या. नुकतंच (Sri lanka) श्रीलंकेविरोधात खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये त्यानं 46 वं शकत ठोकलं. (Virat kohli) विराट कोहली आणि शुभमन गिल (Shubhman Gill) या दोघांनीही संघाला 95 धावांची भक्कम सुरुवात करून दिली. 15.2 षटकांमध्ये त्यांनी ही कामगिरी केली. ज्यानंतर विराटची बॅट खऱ्या अर्थानं तळपली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील चार एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटनं ठोकलेलं हे तिसरं शतक ठरलं. तिथे 2023 या वर्षाची दणक्यात सुरुवात करत विराटनं मैदान गाजवलं आणि इथे त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या क्रीडारसिकांनी पुन्हा एकदा या शतकवीरावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव केला. इन्स्टाग्राम (Instagram memes) म्हणू नका किंवा मग ट्विटर, सगळीकडे विराटच्या 166 धावांचंच कौतुक होताना दिसलं. काही मीम्स तर इतके विनोदी होते की हसून हसून पोट दुखायची वेळ आली. 


मराठमोळं कोहली कुटुंबही चर्चेत... (Maharashtrachi hasya jatra kohli video)


विराट कोहलीच्या खेळीची चर्चा होत असतानाच एक मराठी कुटुंबही प्रचंड लोकप्रिय झालं. बरं, हे कुटुंब रसिकांसाठी नवं नाही. कारण, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून हे कुटुंब काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रसाद खांडेकर, शिवाली परब, नम्रता संभेराव आणि प्रियदर्शनी या कलाकारांनी ज्या कमालीनं हे स्कीट सादर केलं होतं, की ही कोहली कुटुंबातील पात्र सध्या प्रत्येकाच्याच कुटुंबातील महत्त्वाचा भाग झाली आहेत. 


हेसुद्धा वाचा : Virat Kohli : यंदाचं वरीस विराटचं, 2023 ठरणार 'लकी'; कोणते कोणते रेकॉर्ड मोडणार?


आता तुम्ही म्हणाल इथे विराटचा काय संबंध? तर, विराटनं शतक ठोकल्यानंतर सोशल मीडियावर जे काही मीम्स व्हायरल झाले, त्यामध्ये ही अवली, कोहली फॅमिलीसुद्धा पुन्हा चर्चेत आली. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पुन्हा पाहून, अरेच्छा! विराटही यांच्याच कुटुंबातला वाटतं... अशा प्रतिक्रिया दिल्या. 





विराटच्या खेळीविषयी थोडं... 


विराटनं त्याच्या कारकिर्दीतील 46 वं शतक ठोकत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटच्या नाबाद 166 धावांच्या बळावर भारतीय संघानं श्रीलंकेविरोधात 350 धावांचा टप्पा ओलांडला.