विराट कोहलीनंतर `हा` खेळाडू बनणार टेस्ट टीमचा कर्णधार?
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असलेल्या विराट कोहलीने नुकतंच टेस्ट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण होणार याचा विचार बीसीसीआय करतेय.
मुंबई : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असलेल्या विराट कोहलीने नुकतंच टेस्ट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण होणार याचा विचार बीसीसीआय करतेय.
कोहलीनंतर हा खेळाडू बनणार कर्णधार
टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या जागी एक असा खेळाडू आहे जो नवा कर्णधार होण्यास योग्य आहे. जसप्रीत बुमराह हा एकमेव स्टार खेळाडू आहे जो कर्णधारपदाचा दावेदार आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहची चांगला खेळ पहायला मिळाला. जसप्रीत बुमराहची खास शैली त्याच्या फॅन्सनाही प्रचंड आवडली.
रोहित शर्मा होणार कर्णधार?
सध्या रोहित शर्मा 34 वर्षांचा आहे. आता बीसीसीआयला अशा व्यक्तीला कर्णधार बनवायचं नाही ज्याच्या कारकिर्दीमध्ये कमी वर्षे शिल्लक राहिली आहेत. अशा स्थितीत 28 वर्षीय जसप्रीत बुमराहला कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद मिळू शकते. विराट कोहलीला वयाच्या 27 व्या वर्षी कसोटीचं कर्णधारपद मिळालं, होतं.
विराट कोहलीनंतर जसप्रीत बुमराहला नवा कर्णधार म्हणून तयार करण्याकडे बीसीसीआयचं लक्ष्य असेल. भारताला नवा कर्णधार बनवायचा असेल तर जसप्रीत बुमराह हा चांगला पर्याय आहे. त्याची चांगली कामगिरीही उत्तम आहे. जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये तसंच भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतो.