लंडन :  ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात शिखर धवनने १२५ धावांची खेळी करत एलिट लिस्टमध्ये स्थान मिळविले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवनने या स्पर्धेत तिसरा शतक करत हर्षल गिब्ज, सौरभ गांगुली, क्रिस गेल यांची बरोबरी केली आहे.  या दिग्गज खेळाडूंशी बरोबरी करत या लिस्टमध्ये 'शिखर' गाठले आहे. त्याने सात सामन्यात ३ शतक केले आहेत. धवनचे करिअरमधील १० वे शतक आहे. 


हर्षल गिब्लने १० सामन्यात तीन शतक केले आहेत. सौरभ गांगुलीने १३ सामन्यात आणि क्रिस गेलने १७ सामन्यात नाबाद तीन शतक केले आहेत