चेन्नई : आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स विरुद्ध शुक्रवारी पंजाब किंग्जने एकतर्फी विजय नोंदविला. सलग तीन पराभवानंतर पंजाबचा हा पहिला विजय होता, तर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पाच सामन्यात तिसरा पराभव झाला आहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलने टॅास जिंकून गोलंदाजी घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्या दरम्यान मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांचा खेळ पॉवरप्लेमध्ये थोडा वेगळा होता. तसेच खूप धीम्यागतीने फलंदाजी केली. त्यामुळे भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.


रोहित शर्माने फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवला फलंदाजीसाठी तिसर्‍या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर ठेवले, तर खराब फॉर्ममध्ये असलेल्या ईशान किशनला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. रोहित शर्माच्या याच निर्णयावर माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि अजय जडेजा (Ajay Jadeja) यांनी टीका केली आहे.


अजय जडेजा म्हणाला की, मागील सामन्यातील खेळ पाहूण आम्ही म्हणात होतो की, मुंबई इंडियन्सची टीम चांगली खेळत नाही, परंतु तरीही ते किमान 150 च्या स्कोअरवर पोहचायचे. पण आज संघ केवळ 130 धावांवर पोहोचू शकला. तुम्ही खराब खेळू शकता आणि लवकर आऊट देखील होऊ शकता. परंतु या सामन्यात संघाच्या फलंदाजीत आक्रमकता दिसलीच नाही, ही मुंबई इंडियन्सची ओळख नाही.


तुम्ही सेहवागला खाली खेळायला सांगाल का?


क्रिकबझशी बोलताना अजय जडेजा म्हणाला, जर तुम्ही पॉवरप्लेमध्ये दोन-तीन बळी गमावले असतील तर मी ही गोष्ट समजू शकलो असतो, परंतु या सामन्यात असे काही नव्हते. तरीही तुम्ही सूर्यकुमार यादव सारख्या खेळाडूला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले नाहीत. आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही वीरेंद्र सेहवागला सलामीऐवजी खालच्या फळीत फलंदाजी करायला सांगाल का?


वीरेंद्र सेहवागने ही क्रिकबझशी बोलताना सांगितले की, "सूर्यकुमार यादव ज्या प्रकारचे फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळेत तो आधीच अर्धशतक ठोकू शकला असता किंवा पॉवरप्लेमध्ये अधिक धावा केल्या असत्या. असे होवू शकते की, तो लवकर आऊट झाला असता, परंतु तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल." रोहित शर्माच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत सेहवाग पुढे म्हणाला, "तुम्ही ज्याला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करायला पाठवला आहे, त्याने सलग चार सामन्यात निराशाजनक खेळ दाखवला आहे आणि अशा खेळाडूला खालच्या ऑर्डरमध्ये ठेवले आहे.


ज्याने चार पैकी तीन सामन्यात आपला चांगला खेळ दाखवला आहे. जेव्हा दोन किंवा तीन विकेट लवकर पडतात तेव्हा पुढील येणाऱ्या फलंदाजांवर दबाव पडतो. सूर्यकुमारला पॉवरप्लेमध्ये फलंदाजीसाठी पाठविण्याचा निर्णय योग्य ठरला असता आणि त्यामुळे खेळात आवश्यक गती मिळाली असती."