रहाणेच्या घरी होणार छोट्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
रहाणे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण
मुंबई : वेस्टइंडीज दौऱ्याच्या आधी भारतीय क्रिकेट टीमचा उपकर्णधार अंजिक्य रहाणेच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. रहाणे लवकरच वडील बनणार आहे. इंस्टाग्रामवर त्याने पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. मराठी वेशभूषेत राधिका धोपावकर आणि अंजिक्य रहाणे दिसत आहे. राधिका ही प्रेग्नेंट आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर चाहते अजिंक्य रहाणेला शुभेच्छा देत आहेत.
अंजिक्य रहाणेने 2014 मध्ये लहाणपणाची मैत्रीण आणि शेजारी राहणारी राधिका धोपावकरसोबत विवाह केला होता.
अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका ही नेहमी त्याच्यासोबत दिसते. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान देखील ती दिसली होती. टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटर्सच्या पत्नी नेहमी मैदानावर उपस्थित असतात.
अंजिक्य रहाणेने आतापर्यंत 56 आंतरराष्ट्रीय टेस्ट, 90 वनडे आणि 20 टी-20 सामने खेळले आहेत. टेस्ट सामन्यांमध्ये त्याने 40.55 च्या रनरेटने 3488 रन केले आहेत. याशिवाय त्याने वनडेमध्ये 35.26 च्या रनरेटने 2962 आणि टी-20 मध्ये 375 रन केले आहेत.
वेस्टइंडीज दौऱ्यासाठी त्याची निवड झाली आहे. अजिंक्य रहाणे टेस्ट टीमचा उपकर्णधार असेल. तर रोहित शर्मा हा वनडे आणि टी-20 टीमचा उपकर्णधार असेल. तर तीनही फॉरमॅटमध्ये विराट कोहली कर्णधार असणार आहे.