अजिंक्य रहाणे की चुकत राहणे? अजिंक्यची `ती` चूक kkr ला पडली महागात!
कालच्या सामन्यात अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप झाला.
पुणे : काल पुण्यातील एमसीएच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरूद कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अखेर कोलकात्याने बाजी मारत मुंबईवर विजय मिळवला. मात्र या सामन्यात चाहत्यांचं लक्ष कोलकात्याच्या ताफ्यात असलेल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर होतं. मात्र कालच्या सामन्यात देखील अजिंक्य रहाणेने साजेसा खेळ केला नाही.
कालच्या सामन्यात अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप झाला. त्याने 11 बॉल्समध्ये केवळ 7 रन्स केले. इतकंच नाही तर फिल्डींग करताना देखील रहाणेच्या खराब कामगिरीने चाहत्यांचा हिरमोड झाला.
मुंबई इंडियन्स फलंदाजी करत असताना 13 व्या ओव्हरमध्ये अजिंक्य रहाणेने तिलक वर्माचा कॅच सोडला. मुळात हा कॅच विकेटकीपर सॅम बिलिंग्स सहजतेने पकडू शकत होता. मात्र मिस कम्युनिकेशनमुळे हा कॅच सुटला.
तिलकने ज्यावेळी शॉर्ट मारला त्यावेळी बिलिंग्स कॅच पकडण्यासाठी धावला. अगदी याचवेळी अजिंक्य रहाणेही बॅकवर्ड पॉईंटवरून कॅच घेण्यासाठी धावला. अखेर हो-नाही या गोंधळामध्ये दोघांकडूनही तिलक वर्माचा कॅच सुटला. रहाणेकडून तिलक वर्माचा कॅच सुटणं कोलकाता नाईड रायडर्सर भारी पडलं. यावेळी तिलक वर्माने नाबाद 38 रन्सची खेळी खेळली.
अजिंक्य रहाणे फलंदाजीमध्येही फ्लॉप
कोलकाता फलंदाजीसाठी उतरली तेव्हाही रहाणेची बॅट चालली नाही. टायमल मिल्सच्या गोलंदाजीवर रहाणेने डॅनियल मिस्लकडे कॅच दिला आणि पव्हेलियनमध्ये परतला. यावेळी त्याने केवळ 11 बॉलमध्ये 7 रन्स केले. आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये रहाणेला केवळ 65 रन्स करता आले आहेत.