मुंबई :  ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत या टी२० सामन्यांना सुरूवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये भारताचा दमदार क्रिकेटर अजिंक्य रहाणे आपली जागा बनवू शकला नाही.


टी-20 सिरीजपासून दूर झालेला अजिंक्य या वेळेचा सदुपयोग करून पत्नी राधिकासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. राधिका आणि अजिंक्य सेशल्समध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. त्यांच्या सुट्टीचे काही क्षण सोशल मीडियामध्ये शेअर केले आहेत. 



 


क्रिकेटच्या तिन्ही फॉरमेटमध्ये अजिंक्यची कामगिरी उत्तम होती. मात्र दमदार फलंदाजी आणि परफॉर्मन्स दाखवूनही अजिंक्यची टी 20 मध्ये निवड न झाल्याने सुनील गावस्करांनीदेखील प्रश्न उपस्थित केला होता. 
'डेसिंग रूममध्ये तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे मीदेखील सिलेक्शन टीमचा निर्णयाचा आदर राखत हे स्वीकारले आहे.' असे अजिंक्य रहाणेने सांगितले आहे.