BCCI ला वैतागून Ajinkya Rahane चा मोठा निर्णय; लवकरच दुसऱ्या देशाच्या टीमकडून खेळणार!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी (Border–Gavaskar Trophy) त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली नाही. अशातच आता अजिंक्य रहाणेने मोठा निर्णय घेतला आहे. रहाणे आता दुसऱ्या देशातील टीमकडून खेळताना दिसणार आहे.
Ajinkya Rahane to play for Leicestershire : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दीर्घकाळापासून भारताकडून कोणत्याच फॉर्मेटमध्ये खेळलेला नाही. रहाणेने सातत्याने टीम इंडियामध्ये (Team India) कमबॅक करण्यासाठी प्रयत्न केले. नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) अजिंक्य रहाणेने चांगली कामगिरी केली. मात्र असं असूनही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी (Border–Gavaskar Trophy) त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली नाही. अशातच आता अजिंक्य रहाणेने मोठा निर्णय घेतला आहे. रहाणे आता दुसऱ्या देशातील टीमकडून खेळताना दिसणार आहे.
दुसऱ्या देशाच्या टीमकडू खेळणार रहाणे
टीम इंडियामधून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यावर्षी काऊंटी क्रिकेटमध्ये लीसेस्टरशरकडून (Leicestershire sign Ajinkya Rahane for 2023 season) खेळताना दिसणार आहे. रहाणेने गेल्यावर्षी जानेवारीमध्ये भारताकडून शेवटचा टेस्ट सामना खेळला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली नाही. लीसेस्टरशर क्लबतर्फे करण्यात आलेल्या घोषणेनुसार, अजिंक्य रहाणे आयपीएलच्या स्पर्धेनंतर 8 काऊंटी सामने आण वनडे कपच्या संपूर्ण सत्रासाठी टीमकडून खेळणार आहे.
आयपीएलनंतर क्लबकडून खेळणार
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचं प्रतिनिधित्व करणारा अजिंक्य रहाणेने लीसेस्टरशर क्रिकेट टीमच्या वेबसाईटशी बोलताना म्हटलं की, मी येणाऱ्या काळात लीसेस्टरशरसोबत खेळणार असल्याचा मला आनंद आहे. लीसेस्टरशरच्या खेळाडूंसोबत खेळण्यास मी फार उत्सुक आहे. रहाणेने 2019 मध्ये हॅम्पशायरकडून खेळताना काऊंटी डेब्यू करत नॉटिंघमशरविरूद्ध शतक ठोकलं होतं.
रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणेची बॅट तळपली
देशांतर्गत सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीध्ये अजिंक्य रहाणेचा खेळ चांगला सुरु आहे. त्याने त्याच्या फलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टेस्ट सामन्यासाठी बीसीसीआय अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मुंबईकडून खेळताना आणि टीमचं नेतृत्व सांभाळताना अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) जवळपास प्रत्येक सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अजिंक्यने 204 रन्सची खेळी केली होती. त्यानंतर देखील त्याच्या बॅटमधून रन्सचा पाऊस पहायला मिळाला.
आतापर्यंत 6 सामन्यामध्ये त्याने 11 डावांमध्ये उत्तम सरासरीने 634 रन्स केले आहे. यामध्ये एक द्विशतक आणि एका 191 रन्सच्या खेळाची समावेश आहे. आसामच्या टीमविरूद्ध त्याने हा उत्तम खेळ केला होता. शिवाय दिल्लीविरूद्धच्या सामन्यात ही त्याने अर्धशतक झळकावलं होतं.