मुंबई : मुंबईचा मराठमोठा खेळाडू अजिंक्य रहाणेचं कसोटी करिअर आधीच धोक्यात आहे. त्याचसोबत आता टी 20 करिअरही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून सतत फ्लॉप होत आहे. टीम इंडियातून अनेकदा संधी देऊन तो उत्तम कामगिरी करू शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता आयपीएलमध्येही कोलकाताकडून खेळताना अजिंक्य रहाणेला विशेष कामगिरी करता आली नाही. अखेर 5 सामन्यांनंतर कर्णधार श्रेयस अय्यरने अजिंक रहाणेला बाहेर बसवलं. 


रहाणेनं आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 5 सामने खेळून केवळ 80 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला होता. हा त्याचा सर्वात वाईट दुसरा परफॉर्मन्स मानला जातो. 2021 मध्ये त्याने 8 धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणेची कामगिरी पाहता टी 20 मधील करिअरही धोक्यात असल्याचं दिसत आहे. 


आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त शून्यावर आऊट होण्याचा रेकॉर्ड हा अजिंक्य रहाणेच्या नावे आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अजिंक्य रहाणे 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे. दरम्यान त्याच्यासोबत संयुक्तपणे अजूनही काही खेळाडू या रेकॉर्डमध्ये पहिल्या नंबरवर आहेत.


अजिंक्य रहाणेसाठी कसोटीसोबत आता टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे त्याच्यावर संन्यास घेण्यासाठी दबाव निर्माण होत असल्याचं दिसत आहे. वाईट फॉर्ममुळे तो ट्रोल होत असून युजर्सही टीका करत आहेत. अजिंक्य रहाणेला पुन्हा फॉर्ममध्ये परतण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.