इंदूर : आयसीसी वर्ल्डकपमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय टीम मधल्या फळीसाठी नवी बॅटसमन धुंडाळण्यात व्यग्र आहे. भारतीय टेस्ट टीमचा उप कॅप्टन अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) अजूनही वनडे टीममध्ये परतीची आशा कायम आहे. 'टेस्ट टीममध्ये मी सलग खेळू शकतो तर वन डे टीममध्येही परतू शकतो', असा विश्वास खुद्द अजिंक्यनंच व्यक्त केलाय. रहाणेनं आपली अंतिम वन डे मॅच फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना खेळली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारपासून भारत विरुद्ध बांग्लादेश  (India vs Bangladesh)  अशी दोन मॅचची टेस्ट सीरिज रंगणार आहे. 'मला फक्त टेस्टमध्ये चांगली कामगिरी करून दाखवायची आहे. मला रन ठोकायचेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की वन डेमध्येही परतू शकेल' असं अजिंक्यनं म्हटलंय.


'स्वत:वर विश्वास ठेवणं आणि हाच आत्मविश्वास कायम राखणं गरजेचं आहे. मी टेस्टमध्ये रन करू शकलो तर निश्चितच मी वनडेमध्येही परतू शकेल' असं रहाणेनं म्हटलंय.


अजिंक रहाणेनं भारतासाठी ९० वन डे मॅच खेळल्यात. तसंच ३५.२६ च्या सरासरीनं २९६२ रन्स ठोकलेत. वनडेमध्ये रहाणेनं ३ शतक आणि २४ अर्धशतक केलेत.


भारतीय टीम टेस्टमध्ये क्रमांक १ वर आहे. बांग्लादेशपूर्वी भारतानं दक्षिण आफ्रिकेला तीन मॅचच्या टेस्ट सीरीजमध्ये ३-० नं पछाडलंय.