मुंबई : येत्या 26 मार्चपासून आयपीएलचा डंका वाजणार आहे. यंदाच्या 15 व्या सिझनमध्ये 10 टीम्स एकमेकांविरूद्ध मैदानात उतरणार आहेत. यासाठी सर्व टीम्समधील खेळाडू प्रॅक्टिस करतायत. आयपीएलच्या दर सिझनमध्ये नवीन रेकॉर्ड्सची नोंद होते. अशातच एक रेकॉर्ड आहे तो म्हणजे सर्वाधिक शून्यावर आऊट होण्याचा. तुम्हाला माहितीये का आयपीएलमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे. या जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त शून्यावर आऊट होण्याचा रेकॉर्ड हा अजिंक्य रहाणेच्या नावे आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अजिंक्य रहाणे 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे. दरम्यान त्याच्यासोबत संयुक्तपणे अजूनही काही खेळाडू या रेकॉर्डमध्ये पहिल्या नंबरवर आहेत.


आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले खेळाडू


  • पीयूष चावला- 13 वेळा

  • हरभजन सिंह- 13 वेळा

  • पार्थिव पटेल- 13 वेळा

  • अजिंक्य रहाणे- 13 वेळा

  • अंबाती रायडू- 13 वेळा

  • रोहित शर्मा- 13 वेळा


एकंदरीत पाहिलं तर पियूष चावला, हरभजन सिंग हे खेळाडू शेवटच्या ओव्हर्समध्ये फलंदाजी करण्यासाठी येतात. यावेळी मोठे शॉट्स खेळण्याच्या नादात ते बाद होतात. तर दुसरीकडे रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसारखे खेळाडू ओपनिंगला येतात. त्यामुळे हे खेळाडू लवकर पवेलियनमध्ये जाण्याची शक्यता अधिक असते.


26 तारखेपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलचे सर्व सामने हे 4 स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. पहिला सामना हा गत विजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज विरूद्ध कोलकाता नाईड रायडर्स असा रंगणार आहे.