भुवनेश्वर : भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या वनडे आणि टी-२० टीममधून बाहेर आहे. पण २०१९ साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपच्या टीममध्ये आपण पुनरागमन करु, असा विश्वास रहाणेनं व्यक्त केला आहे. मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा विश्वास मला आहे. त्यामुळे मी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. यामुळे भारतीय टीममध्ये पुनरागमन करण्यासाठी मला मदत होईल, असं रहाणे म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पिन बॉलरविरुद्ध कामगिरी सुधरावी लागेल, असं मत रहाणेनं व्यक्त केलं. २०१६ पासून खेळलेल्या ४८ इनिंगमध्ये रहाणेनं ३ शतकं आणि ८ अर्धशतकं केली आहेत. मी चांगल्या सुरुवातीला मोठ्या स्कोअरमध्ये बदलू शकतो, असा भरवसा रहाणेनं व्यक्त केला.


माझ्या तंत्रामध्ये काहीच समस्या नाही, त्यामुळे मी चिंतेत आहे. मला ३० आणि ४० रनच्या खेळीला अर्धशतक आणि शतकामध्ये बदलावं लागेल. अनेक वेळा तुम्ही चांगले खेळत असता पण तुम्हाला पाहिजे तसा परिणाम प्रत्येकवेळी तुम्हाला हवा तसा येत नाही, अशी प्रतिक्रिया रहाणेनं दिली.


स्पिन बॉलरविरुद्ध चांगल्या पद्धतीनं खेळता यावं म्हणून मी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळलो, असं रहाणेनं सांगितलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आम्ही १० दिवस आधीच चाललो आहेत. तसंच सिडनीमध्ये आमचा सराव सामनाही आहे. आमची बॉलिंग मजबूत आहे, असं वक्तव्य रहाणेनं केलं.